अर्थव्यवस्थेची गती मंदावली; मोदी सरकारची कबुली

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

संथ अर्थव्यवस्थेला परदेशी तसेच देशांतर्गत आर्थिक, वित्तीय घटक जबाबदार असल्याचे जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या वाटेवर आहे.

नवी दिल्ली: चालू वर्षात देशाचा आर्थिक विकास मंदावल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. 2015-16 मधील 8 टक्के विकासदराच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षांत विकासदर कमी होऊन 7.1 टक्के राहिला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नवी दिल्लीत महिनाभरावर येऊ घातलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक घेतली.

संथ अर्थव्यवस्थेला परदेशी तसेच देशांतर्गत आर्थिक, वित्तीय घटक जबाबदार असल्याचे जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या वाटेवर आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विस्तारते आहे. भारत सरकार विविध पातळीवर काम करत असून अर्थव्यवस्थेला गती आणण्यासाठी निर्मिती, वाहतूक, ऊर्जा, ग्रामीण पायाभूत, थेट परकी गुंतवणूक अशा क्षेत्रात जोरदार कामाला सुरूवात केली आहे, असेही जेटली म्हणाले.

मात्र बँकांमधील वाढलेले एनपीए, काही क्षेत्रातील मंदीच्या स्थितीमुळे तसेच सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात कमी झालेली ढोबळ स्थिर गुंतवणूक, कंपन्यांचा आर्थिक चणचणीचा ताळेबंद अशा कारणांमुळे देशाचा विकासदर मंदावला आहे.

Web Title: Indian economic growth slowed down in 2016-17 says Arun Jaitley