तुमच्याकडे इंडियन ऑईलचे शेअर्स आहेत का ? मग ही बातमी नक्की वाचा...| Indian Oil Stock | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IOCL Recruitment
तुमच्याकडे इंडियन ऑईलचे शेअर्स आहेत का ? मग ही बातमी नक्की वाचा...| Indian Oil Stock

तुमच्याकडे इंडियन ऑईलचे शेअर्स आहेत का ? मग ही बातमी नक्की वाचा...

Indian Oil Shares: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात IOC ने अलीकडेच मार्च तिमाहीचे निकाल सादर केले. कंपनीची कमाई 6 टक्क्यांनी वाढली आहे. नफ्यातही सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्जिनमध्येही वाढ आहे पण ती वाढीच्या तुलनेत कमकुवत आहे. त्याच वेळी, कंपनीने 1:2 च्या बोनस शेअरची घोषणा केली आहे, म्हणजे त्यांच्या शेअरहोल्डर्सना 2 शेअर्ससह 1 बोनस शेअर मिळेल. याशिवाय कंपनीने फायनल डिव्हिडेंडही जाहीर केला आहे. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत असले तरी शेअरहोल्डर्सच्या दृष्टीने कंपनीने 2 चांगले निर्णय घेतले आहेत. (Important news for Indian oil Stockholders)

IOC ने त्यांच्या शेअरहोल्डर्सना 1:2 बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता भागधारकांना 2 शेअर्ससह 1 बोनस शेअर मिळणार आहे. याशिवाय कंपनीने फायनल डिव्हिडेंडही जाहीर केला आहे. कंपनीने प्रति शेअर 3.60 रुपये (प्री बोनस) जाहीर केला आहे.क्रेडिट सुइसने या शेअरचे रेटिंग न्यूट्रल तसेच ठेवले आहे. मात्र, गुंतवणूकदारांना 146 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. याशिवाय जेफरीजने गुंतवणूकदारांना हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे आणि 115 रुपयांचे टारगेट दिले आहे.

ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनने या स्टॉकवर ओव्हरवेटचे रेटिंग कायम ठेवले आहे आणि गुंतवणूकदारांसाठी टारगेट 163 रुपये निश्चित केले आहे.

कंपनीचा तिमाही निकाल ?
अलीकडेच कंपनीने मार्च तिमाहीचे निकाल सादर केले आहेत. कंपनीने अपेक्षेपेक्षा कमकुवत निकाल सादर केले. कंपनीचा महसूल 177287.3 कोटी होता आणि त्यात 6.3% ची वाढ झाली होती, तर EBITDA 11627.5 कोटी होता आणि त्यात 17.9% वाढ झाली होती पण ती अंदाजापेक्षा कमकुवत होती. या व्यतिरिक्त, कंपनीचे मार्जिन 6.5% होते आणि कंपनीने या तिमाहीत 6021.9 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 2.7% ची वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.