Indian Railway : फेसबुक, ट्विटरनंतर आता भारतीय रेल्वेने केली कर्मचारी कपात; वाचा काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railway

Indian Railway : फेसबुक, ट्विटरनंतर आता भारतीय रेल्वेने केली कर्मचारी कपात; वाचा काय आहे कारण?

Indian Railway News: गेल्या काही दिवसांत रेल्वेमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष लक्ष देत आहे. भारतीय रेल्वेचे अधिकारी योग्य पद्धतीने काम करतात याची खात्री करण्यासाठी रेल्वेने अलीकडेच काही अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. भारतीय रेल्वेने 38 भ्रष्ट आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. याशिवाय एकूण 139 कर्मचाऱ्यांनाही रेल्वेने स्वेच्छानिवृत्तीवर पाठवले आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रेल्वेच्या दोन उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नुकतेच दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले होते. यानंतर रेल्वेने कारवाई केली आणि दोघांनाही पदावरून हटवले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेतील भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबण्यास सांगितले आहे. यासोबतच योग्य काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे, असेही ते म्हणाले. अहवालानुसार, जुलै 2021 पासून, रेल्वेने दर तीन दिवसांनी एका अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत एकूण 139 कर्मचाऱ्यांना रेल्वेने स्वेच्छानिवृत्तीवर पाठवले आहे. यासोबतच 38 ​​अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

हेही वाचा: Job Cuts :आर्थिक मंदीचा मीडिया कंपन्यांना फटका; कर्मचारी कपातीचे मोठे संकट

पर्यवेक्षक ग्रेड 7 अंतर्गत येणाऱ्या 80,000 कर्मचाऱ्यांना बढतीसाठी एक आनंदाची बातमी रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये येणाऱ्या अडचणी मंत्रालयाने दूर केल्या आहेत. यानंतर पर्यवेक्षक दर्जाच्या किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. एखादा कर्मचारी कामात निष्काळजीपणा करताना किंवा भ्रष्टाचारात आढळला तर त्याला नोकरीतून बडतर्फ केले जाईल किंवा व्हीआरएस दिला जाईल.