भारतीय रेल्वे आणतेय 'आयआरसीटीसी'चा आयपीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय रेल्वे आणतेय 'आयआरसीटीसी'चा आयपीओ

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वे आणतेय 'आयआरसीटीसी'चा आयपीओ

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून आयआरसीटीसी 480 कोटींचे भागभांडवल उभारणार आहे. यासाठी सरकारच्या मालकीचे 12.5 टक्के शेअर विकले जाणार आहेत. साधारणतः 2 कोटी शेअर विकले जाणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची कामगिरी निराशाजनक असल्याने आयआरसीटीसीसहित बहुतांश कंपन्यांनी त्यांचे आयपीओ बाजारात आणण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, गेल्या शुक्रवारी सरकारने घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयानंतर शेअर बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. परिणामी आयपीओ बाजारात आणण्याची हीच वेळ साधण्याचा आयआरसीटीसीने निर्णय घेतला आहे.

सोलापूर : बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

इंटरनेट तिकीट, केटरिंग, ‘रेल नीर’ ब्रँड अंतर्गत पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि प्रवास आणि पर्यटन या चार विभागांमध्ये आयआरसीटीसीचा व्यवसाय  विभागला गेला आहे. ऑगस्टमध्ये नियामकांकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये कंपनीची एकूण उलाढाल 1,899 कोटी इतकी होती. तर, निव्वळ नफा 23.5 टक्क्यांनी वाढून 272.5 कोटी डॉलर झाला आहे. केटरिंग विभाग हा सर्वाधिक महसूल गोळा करणारा विभाग आहे. या विभागातून तब्बल 1,044 कोटींची उलाढाल झाली. तर, टिकेटिंग, प्रवास आणि पर्यटन आणि पाणी यामधून अनुक्रमे 235, 444 आणि 176 कोटींचा महसूल गोळा झाला.

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिवसाला तब्बल 8 लाख तिकिटे बुक केली जातात. वेबसाईटवर दररोज येणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता कंपनी आशिया-पॅसिफिक विभागात आघाडीच्या वेबसाइट्सपैकी एक आहे.

Web Title: Indian Railways Will Launch Irctcs Ipo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top