रुपया पुन्हा गडगडला

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाने सोमवारी 67 पैशांची गटांगळी खाल्ली. आयातदारांकडून डॉलरला वाढलेली मागणी आणि परकी गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातून निधी काढून घेण्याचा सपाटा यामुळे रुपया गडगडला. 

आज सकाळी रुपया 72.76 च्या पातळीपर्यंत घसरला. नंतर तो 73.13 या दिवसभरातील नीचांकी पातळीवर गेला. अखेर तो 67 पैशांच्या घसरणीसह 73.12 वर बंद झाला. जागतिक पातळीवर डॉलरच्या तुलनेत प्रमुख चलनांमध्ये घसरण झाल्याचा परिणाम आज रुपयावर झाला. परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरेल 72.61 डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात घसरण झाल्याने रुपयातील पडझड काही प्रमाणात रोखली गेली, अशी माहिती चलन बाजार विश्‍लेषकांनी दिली. 

मागील दोन सत्रांत रुपया 150 पैशांनी वधारला होता. मागील शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने शंभर पैशांची उसळी घेतली होती. त्या वेळी तो डॉलरच्या तुलनेत 72.45 या पातळीवर बंद झाला होता. मागील पाच वर्षांतील एका दिवसात झालेली ही सर्वांत मोठी वाढ ठरली होती. 

डॉलरच्या तुलनेत रुपया 
एप्रिल ते ऑक्‍टोबर 

- 13.8 टक्के घसरण 
---------------------- 
डॉलर : 73.12 रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian rupee tumbles against US dollar