esakal | निर्देशांकांची चौथी घसरण; सेन्सेक्स 360 अंश पडला | share market
sakal

बोलून बातमी शोधा

share market

निर्देशांकांची चौथी घसरण; सेन्सेक्स 360 अंश पडला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे आज भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांकांनी सलग चौथ्या दिवशी घसरण अनुभवली. आज सेन्सेक्स (Sensex) 360.78 अंशांनी तर निफ्टी (nifty) 86.10 अंशांनी कोलमडला. आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 58,765.58 अंशांवर तर निफ्टी 17,532.05 अंशांवर स्थिरावला. केंद्र सरकारने (central Government) काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख उत्पादनांमध्ये (कोअर सेक्टर) वाढ झाली असली तरी जागतिक बातम्या फार उत्साहवर्धक नव्हत्या.

हेही वाचा: Sakal Impact : महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

युरोपमध्ये चलनवाढ होत असून जागतिक विकासाचा वेगही मंदावत आहे, अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या वाढली आहे तसेच चिनी उद्योगक्षेत्रातही एकामागोमाग एक अडचणी येत असल्याच्या बातम्या आल्याने आज जागतिक शेअरबाजार नरमगरम होते. त्याचेच अनुकरण आज भारतीय शेअरबाजारांनी केले. सेमिकंडक्टर चिप च्या तुटवड्यामुळे मारुतीने या महिन्यात उत्पादन कमी करणार असल्याचे जाहीर केल्याने त्याच्या भावात घट झाली. तर टाटा सन्सला एअर इंडियाचा ताबा मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्याने अन्य विमान कंपन्यांच्या शेअरचे भाव नरमगरम राहिले.

आज बजाज फिनसर्व्ह चा भाव 613 रुपयांनी कमी होऊन 17,175 रुपयांवर तर मारुतीचा भाव 175 रुपयांनी घटून 7,159 रुपयांवर आला. लार्सन अँड टुब्रो 1,700 च्या खाली (बंद भाव 1,696 रु.) गेला तर भारती एअरटेल 672 रुपयांवर बंद झाला. एशियन पेंट्स (3,178), बजाज फायनान्स (7,522), एचडीएफसी (2,712), टीसीएस (3,729) यांचे भाव कमी झाले.

मारुतीच्या शेअरचा भाव कोसळत असताना दुसरीकडे आज वाढलेल्या शेअर्स मध्ये महिंद्र आणि महिंद्र टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे तीन टक्क्यांहूनही जास्त किंवा 24 रुपये ( बंद भाव 827 रु.) वाढला. बजाज ऑटोदेखील वाढून 3,855 रुपयांवर गेला. औषधनिर्मिती कंपन्यांचेही भाव आज वाढले, डॉ. रेड्डीज लॅब 67 रुपयांनी वाढून 4,953 रुपयांवर तर सनफार्मा 826 रुपयांवर गेला. रिलायन्स इंडस्ट्रीज (2,522) तसेच अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील यांचेही भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 46,700 रु.

चांदी - 59,500 रु.

loading image
go to top