esakal | Indian Share Market: शेअरबाजाराची आगेकूच मंदावली
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Indian Share Market: शेअरबाजाराची आगेकूच मंदावली

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : जागतिक शेअर बाजारांमधील (Indian Share market) नकारात्मक वातावरणामुळे आज भारतीय शेअर बाजारांची आगेकूच मंदावली व त्यांच्यात अल्प वाढ झाली. आज सेन्सेक्स (Sensex) 69.33 अंश तर निफ्टी (nifty) 24.70 अंश वाढला. आज दिवसअखेर सेन्सेक्स 58,247.09 अंशांवर तर निफ्टी 17,380 अंशांवर स्थिरावला. सुरुवातीला भारतीय शेअर बाजार चांगले तेजीत होते. सेन्सेक्स तर 58,482.62 अंशांपर्यंत गेला होता, मात्र दुपारी युरोपीय शेअर बाजार उघडल्यावर भारतीय शेअर बाजारांमध्येही नफावसुली झाली. अमेरिकेतील (America) चलनवाढीचा तपशील जाहीर होणार असल्याने गुंतवणुकदारांनी (investors) सावध पवित्रा घेतला. अमेरिकेतील कोरोना पॅकेज (corona package) सुरु ठेवायचे का याचा निर्णय फेड तर्फे चलनवाढीचा तपशील जाहीर झाल्यावर घेतला जाईल.

हेही वाचा: टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

इंडसइंड बँक (बंद भाव 1,036 रु.), एचसीएल टेक (1,238), कोटक बँक (1,867), टेक महिंद्र (1,450), लार्सन अँड टुब्रो (1,696), बजाज ऑटो (3,750), टायटन, टीसीएस (3,885), आयटीसी (216) या शेअर चे भाव वाढले. तर एचडीएफसी (2,817), नेस्ले (20,232), अल्ट्राटेक सिमेंट (7,857), हिंदुस्थान युनिलीव्हर (2,762), टाटा स्टील (1,452) यांचे भाव कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,000 रु.

चांदी - 63,200 रु.

loading image
go to top