निर्देशांकांची तिसरी घसरण; सेन्सेक्स 372 अंश रोडावला | Indian share market update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

निर्देशांकांची तिसरी घसरण; सेन्सेक्स 372 अंश रोडावला

मुंबई : नफावसुलीमुळे आज भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी घसरले. सेन्सेक्स (Sensex) 372.32 अंश तर निफ्टी (nifty) 133.85 अंशांनी रोडावला, आजची ही घसरण पाऊण टक्क्यांपर्यंत होती. आज दिवसअखेर सेन्सेक्स 59,636.01 अंशांवर तर निफ्टी 17,764.80 अंशांवर स्थिरावला.

हेही वाचा: "एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी"

आज बाजार उघडल्यावर पंधरा मिनिटे सेन्सेक्स साठ हजारांच्या वर गेला होता. मात्र नंतर दिवसभरात केव्हाही त्याला तो टप्पा गाठता आला नाही. आज वाहनउद्योग, आयटी, औषधनिर्मिती, धातूकंपन्या आदी सर्वच क्षेत्रात नफावसुली झाली. चलनवाढीची चिंता तसेच सणासुदीच्या दिवसांमध्येही वाहनांसाठी ग्राहकांकडून आलेली कमी मागणी यामुळे धास्तावलेल्या गुंतवणुकदारांनी नफावसुलीवर भर दिला.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख तीस समभागांपैकी फक्त स्टेटबँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय, हिंदुस्थान युनिलीव्हर या सहाच शेअरचे भाव जेमतेम दोन ते नऊ रुपये इतकेच वाढले. तर निफ्टीमध्ये वरील शेअरबरोबरच डीव्हीज लॅब आणि इंडियन ऑईल यांचे भाव वाढले. त्याखेरीज सेन्सेक्स व निफ्टी मधील सर्व प्रमुख शेअरचे भाव कमी झाले.

महिंद्र आणि महिंद्र (बंद भाव 923 रु.), टेक महिंद्र, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो (1,898), टाटा स्टील (1,186) व इंडसइंड बँक हे शेअर टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे अडीच ते सव्वातीन टक्के पडले. डॉ. रेड्डीज लॅब (4,668), मारुती, टीसीएस या शेअरचे भावही कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 49,100 रु.

चांदी - 66,300 रु.

loading image
go to top