दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीत! 50 हजार कोटींचा फटका

दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीत! 'ड्रॅगन'ला 50 हजार कोटींचा फटका
दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीत
दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीतSakal
Summary

दिवाळीपूर्वी चीनला मोठा झटका बसला असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे ड्रॅगनचे सुमारे 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

दिवाळीपूर्वीच (Diwali) भारतीयांनी (Indians) चीनला (China) दिवाळखोरीत ढकललं आहे. दिवाळीपूर्वी चीनला मोठा झटका बसला असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे 'ड्रॅगन'चे (Dragon) सुमारे 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders - CAIT) ने म्हटले आहे की, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनामुळे या सणासुदीच्या हंगामात चीनच्या व्यापारात 50 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, तर या काळात देशांतर्गत विक्री वाढणार असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटींची वाढ होईल.

दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीत
दिवाळी बंपर ऑफर! दहा ब्रॅंडेड स्मार्ट टीव्ही जवळपास निम्म्या किमतीत

CAIT ने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या दिवाळी सणासुदीच्या काळात देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वाढती संख्या पाहता, व्यापारी वर्गाला मोठ्या व्यवसायाची अपेक्षा आहे. दिवाळीच्या विक्रीच्या काळात, सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे भांडवल ग्राहकांच्या खर्चातून अर्थव्यवस्थेत येऊ शकते. CAIT ने सांगितले की, गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही CAIT ने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हाक दिली असून देशातील व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून होणारी आयात बंद केली आहे, त्यामुळे या दिवाळी सणासुदीत चीनला सुमारे 50 हजार कोटींचे नुकसान होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, गेल्या वर्षीपासून ग्राहकही चिनी वस्तूंच्या खरेदीत रस घेत नाहीत, त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.

CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया म्हणाले की, CAIT ची संशोधन शाखा CAIT रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीने अनेक राज्यांतील 20 शहरांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आले आहे की, या वर्षी आतापर्यंत अनेक भारतीय व्यापारी किंवा आयातदारांकडून चीनमध्ये दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर तत्सम वस्तूंची ऑर्डर देण्यात आलेली नाही आणि यंदाची दिवाळी पूर्णपणे हिंदुस्थानी दिवाळी म्हणून साजरी केली जाईल. ही शहरे नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर, लखनौ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, मदुराई, पॉंडिचेरी, भोपाळ आणि जम्मू आहेत. दरवर्षी राखी ते नवीन वर्ष या पाच महिन्यांच्या सणासुदीच्या काळात भारतीय व्यापारी आणि निर्यातदार चीनमधून सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात करतात.

दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीत
EPF व्याज : मोदी सरकार 6 कोटींहून अधिक लाभार्थींना देणार दिवाळी भेट

बी. सी. भरतिया म्हणाले की, यावर्षी राखी सणाच्या वेळी चीनमध्ये सुमारे 5000 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे आणि गणेश चतुर्थीला 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता दिवाळीतही हाच ट्रेंड दिसून येतो. हे स्पष्टपणे सूचित करते की, केवळ व्यापारीच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालत नसून, ग्राहकही चीनमधून बनवलेल्या वस्तू विकत घ्यायला तयार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com