esakal | मालवाहतुकीच्या भाडेवाढीचे संकेत, महागाई आणखी भडकणार
sakal

बोलून बातमी शोधा

महागाई

मालवाहतुकीच्या भाडेवाढीचे संकेत, महागाई आणखी भडकणार

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : दररोज डिझेलचे दर (diesel rate) वाढत असतानाच टोलच्या दरातही वाढ झाल्याने मालाची वाहतूक करणाऱ्यांना माल वाहतूकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात महागाई (inflation increase) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किंमती वाढल्याने महागाई शिखरावर पोहोचली आहे. त्यातच मालवाहतूकदारांनी दरवाढ केल्यास महागाई आणखी वाढणार असून सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. (inflation increases due to hike in fuel rate)

हेही वाचा: प्राध्यापकांची मेगा भरती कधी होणार? उदय सामंतांनी दिली माहिती

पेट्रोलियम पदार्थ तसेच विविध उत्पादित वस्तूंच्या मूल्यामध्ये झालेल्या वाढीमुळे महागाई वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मागील सहा आठवड्यातील ही २५ वी दरवाढ ठरली आहे. नागपुरात पेट्रोल १०२.७० पैसे दर डिझेल ९३.०३ पैसे प्रति लिटर झाले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, तर काहींचे पगार कमी झाले असतानाच महागाईच्या फटक्याने नागरिक पुरते घायाळ झाले आहेत. त्यात आता मालवाहतुकीच्या दरात वाढ होणे अपेक्षित आहे. संसाराचा गाडा चालवताना ट्रक व्यावसायिकांना चांगलीच कसरत करावी लागते. टाळेबंदीवरील निर्बंध काढल्यानंतरही विदर्भातीलच नव्हे तर देशातील ८० टक्के माल वाहतूक बंद आहे. ट्रक वाहतूक व्यवसायाला घरघर लागली आहे.

डिझेलने ऐतिहासिक उंची गाठली आहे. याचा सर्वाधिक फटका ट्रान्स्पोर्ट व्यवसायाला बसला आहे. नफा राहू दे पण माल वाहतूक करताना मिळणाऱ्या भाड्यातूनही खर्च भागवताना नाकीनऊ येत आहे. इंधनाचे दर वाढल्याने व्यापारी आणि उद्योजकही मागणीनुसार मालाची ने -आण करीत असल्याने त्यावरही बंधने आली. टाळेबंदीत ८० टक्के माल वाहतूक करणाऱ्या ट्रकची चाके थांबली होती. त्यावेळी केवळ जीवनावश्यक वस्तू लोखंड, सिमेंट आणि कोळशाची वाहतूक सर्वाधिक होत होती. वर्षभरात डिझेलच्या किमतीत प्रति लिटर २५ ते २६ रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे वाहतूकदारांनी पाच टक्के दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा बुधवारी; ३५ मुलांचे स्क्रिनिंग

विदर्भात ३० हजार ट्रक आहेत. त्यातील ८० टक्के ट्रक उभेच आहेत. त्यामुळे २२५ कोटीचा व्यवसाय रोजचा बुडत आहे. टाळेबंदीमुळे अनेकांचे मासिक हप्ते बंद आहेत. त्यावर चक्रवाढ व्याज सुरूच आहे. केंद्र सरकारने रोड टॅक्स आणि विम्यांमध्ये सूट द्यावी, अशी आमची मागणी आहे.
कुक्कू मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रक्स युनिटी
  • डिझेल खर्च - ३ हजार रुपये

  • टोल टॅक्स - ७००० रुपये

  • मालाची भरणी - उतरणी २५०० रुपये

  • ड्रायव्हर भत्ता - ७०० ते एक हजार

  • ट्रकचा मेंटनन्स - २०००

  • एकूण - १५,२०० रुपये

loading image