घाऊक चलनवाढ मंदावली 

पीटीआय
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नवी दिल्ली - घाऊक चलनवाढीत मार्चमध्ये किरकोळ घसरण होऊन ती २.४७ टक्‍क्‍यांवर आली आहे. मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या भावात घसरण झाली असून, विशेषत: डाळी आणि भाज्या स्वस्त झाल्यामुळे चलनवाढ मंदावली आहे. 

नवी दिल्ली - घाऊक चलनवाढीत मार्चमध्ये किरकोळ घसरण होऊन ती २.४७ टक्‍क्‍यांवर आली आहे. मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या भावात घसरण झाली असून, विशेषत: डाळी आणि भाज्या स्वस्त झाल्यामुळे चलनवाढ मंदावली आहे. 

घाऊक चलनवाढ निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. फेब्रुवारीमध्ये ती २.४८ टक्के आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये ५.११ टक्के होती. सरकारी आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या भावात मार्चमध्ये ०.२९ टक्के घसरण झाली आहे. मागील महिन्यात त्यात ०.८८ टक्के वाढ झाली होती. मार्चमध्ये भाज्यांची महागाई २.७० टक्‍क्‍यांने कमी झाली असून, डाळींची महागाई २०.५८ टक्के आणि गव्हाची महागाई १.१९ टक्‍क्‍याने कमी झाली आहे. इंधन आणि ऊर्जेची महागाई मार्चमध्ये ४.७० टक्‍क्‍यांने वाढली आहे. त्याआधीच्या महिन्यात ती ३.८१ टक्के होती. 

जानेवारीतील घाऊक चलनवाढीच्या आकड्यात सुधारणा करण्यात आली आहे. ती आता २.८४ टक्‍क्‍यांऐवजी ३.०२ टक्के असेल. मागील आठवड्यात किरकोळ चलनवाढ ४.२८ टक्के या पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली होती. रिझर्व्ह बॅंक पतधोरण आढाव्यात व्याजदर कपातीचा निर्णय घेताना प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा विचार करते. 

जागतिक पातळीवर कच्चे तेल व नैसर्गिक वायूचे भाव वाढत असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण होत आहे. यामुळे एप्रिल महिन्यात घाऊक चलनवाढ वाढण्याची शक्‍यता आहे. 
- आदिती नायर, प्रधान अर्थतज्ज्ञ, इक्रा

चलनवाढीचा आलेख (आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
फेब्रुवारी - २.४८ 
मार्च  - २.४७ 
मार्च २०१७ - ५.११ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inflation slow