esakal | 'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बेंगलुरूः बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींवर चित्रपट बनविण्याकडे वळले आहेत. खेळाडू, चित्रपट कलाकार ते अगदी राजकारण्यांच्या जीवनाचा प्रवास आजवर विविध चरित्रपटांद्वारे उलगडण्यात आला आहे. आता यामध्ये भर पडणार आहे आयटी क्षेत्रातील इन्फोसिसचे सह-संस्थापक  नारायण मूर्तीं यांची. 

सर्वसाधारण घरातील शिक्षकाचा मुलगा ते आयआयटी कानपुरमधून मास्टर्स डिग्री आणि पत्नीकडून 10 हजार रूपये उसने घेऊन वयाच्या 35व्या वर्षी कंपनीची स्थापना ते 3 लाख कोटींचे बाजार भांडवल असलेली कंपनी बनविण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तींचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी चित्रपट निर्माते संजय त्रिपाठी प्रयत्नशील आहेत. त्याला नारायण मूर्ती यांनी होकार देखील दिला असल्याचे समजते. चित्रपटाची स्क्रिप्ट मूर्तीना पाठविण्यात आली असून त्याला होकार मिळताच चित्रपट निर्मितीला सुरुवात होईल. 

दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी नारायण मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर आठ महिन्यांनंतर मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे. या चित्रपटात सत्याचा विपर्यास करू नये ही साधी पण महत्त्वाची अट ठेवत मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी संजय त्रिपाठींनी नारायण मूर्ती यांना बायोपिकची कल्पना बोलून दाखवली होती. अनेक भेटीगाठी झाल्यानंतर मूर्ती यांनी बायोपिक काढण्यास मंजूरी दिली असल्याची माहिती मिळत आहे.

नारायण मूर्तींचा साधेपणा, काम मिळविताना त्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा, इन्फोसिसची गरुडभरारी याचे अनेक किस्से ऐकायला किंवा वाचायला मिळतात. मात्र, ते मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. 

loading image