इन्फोसिसच्या नफ्यात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

बंगळूर - इन्फोसिसच्या नफ्यात सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये १०.३ टक्के वाढ होऊन तो ४ हजार ११० कोटी रुपयांवर गेला आहे. इन्फोसिसला मागील वर्षी याच तिमाहीत ३ हजार ७२६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

कंपनीचा महसूल तिसऱ्या तिमाहीत १७.३ टक्‍क्‍याने वाढून २० हजार ६०९ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत २ अब्ज डॉलरची कंत्राटे मिळाली आहेत. डिजिटल महसूल ९०५ दशलक्ष डॉलरने वाढला असून, एकूण महसुलात त्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. कंपनीने प्रतिसमभाग ७ रुपये लाभांश जाहीर केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys Profit Increase