esakal | 'या' कंपनीला केवळ तीन महिन्यात झाला साडेचार हजार कोटींचा नफा !
sakal

बोलून बातमी शोधा

Infosys Q3 profit jumps 23.5% to Rs 4457 cr
  • इन्फोसिसच्या नफ्यात 23 टक्के वाढ
  • तिसऱ्या तिमाहीत 4 हजार 457 कोटी रुपयांवर पोचला

'या' कंपनीला केवळ तीन महिन्यात झाला साडेचार हजार कोटींचा नफा !

sakal_logo
By
वृत्तसेवा

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात 23.5 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. कंपनीला तिमाहीत 4 हजार 457 कोटी रुपयांचा घसघशीत नफा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 3 हजार 609 कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसच्या महसुलात 7.9 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. कंपनीला 23 हजार 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 21 हजार 400 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. कंपनीने चालू आर्थिक वर्षात महसूल वाढीचा 10 ते 10.5 टक्‍क्‍यांच्या अंदाज वर्तवला आहे. कंपनीच्या कार्यान्वन नफ्यात 21.9 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत तो 22.6 टक्के होता. तिसऱ्या तिमाही निकालातून हे स्पष्ट दिसत आहे, की आम्ही ग्राहकांशी जोडलेले आहोत. डिजिटल बदलांच्या काळात आम्ही पुढचे पाऊल टाकत आहोत, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सलिल पारेख यांनी सांगितले.

मंत्री होऊन गोव्याला गेला अन् एका मसाजने...

दरम्यान, शेअर बाजारात इन्फोसिसचा समभाग शुक्रवारी 10.70 रुपयांनी वधारून 738.25 रुपयांवर व्यवहार करीत स्थिरावला. कंपनीचे बाजारभांडवल 3 लाख 14 हजार 387 कोटी रुपयांवर पोचले आहे.

loading image