'ऑटोमेशन'मुळे इन्फोसिसमध्ये 9,000 कर्मचाऱ्यांची कामे बंद!  

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

बंगळूर: भारतातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या (ऑटोमेशन) वापरामुळे कमी कौशल्य लागणाऱ्या नोकऱ्यांवर अतिक्रमण सुरु झाल्याचे दिसून येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गेल्या वर्षी इन्फोसिसमधील 8,000 ते 9,000 कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरुप बदलण्यात आले आहे. कंपनीने या कर्मचाऱ्यांवर इतर प्रकल्पांमधील जबाबदाऱ्या सोपविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे अध्यक्ष कृष्णमुर्ती शंकर यांनी दिली.  

"आम्ही दर तिमाहीत सुमारे 2,000 कर्मचाऱ्यांना पदमुक्त करीत आहोत. नव्या जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडता याव्यात यासाठी कंपनीकडून त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे", असे शंकर यांनी सांगितले. बंगळुरु येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

यापुढे कंपनीत नव्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रमाणदेखील कमी होत जाईल, असेही ते म्हणाले. इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये सुमारे 5,700 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. गेल्यावर्षी याच काळात हा आकडा तब्बल 17,000 एवढा होता. पहिल्या टप्प्यात कंपनीने 490 लोकांच्या बॅचला मशीन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशिलय इंटेलिजन्स) तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण दिले आहे.

जगभरातील अनेक कंपन्या आता बीपीओ, अॅप्लिकेशन मॅनेजमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटसाठी स्वयंचलित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत.  तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारतातील 69 टक्के नोकऱ्या धोक्यात येतील असा अंदाज जागतिक बँकेच्या एका संशोधनात व्यक्त करण्यात आला होता.

Web Title: Infosys 'releases' 9,000 employees due to automation