'व्हिसलब्लोअर'च्या तक्रारीत तथ्य नाही : इन्फोसिस

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने 'व्हिसलब्लोअर'च्या तक्रारीत तथ्य नाही स्पष्ट केले आहे.

बंगळूर: माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने ताळेबंदात नफ्याची आकडेवारी चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा 'व्हिसलब्लोअर'च्या तक्रारीत तथ्य आढळून आले नसल्याचे इन्फोसिसने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात तिमाही आर्थिक निकाल जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने केला होता. 

इन्फोसिसने राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई)  दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “कंपनीवर करण्यात आलेल्या आरोपाबाबत कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आरोपात कोणतेही तथ्य नाही.” 

इन्फोसिसने आरोपात तथ्य नसल्यानेच सांगताच कंपनीच्या शेअरने इंट्राडे व्यवहारात 6 टक्क्यांची उसळी घेत 732 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. 

काय होते प्रकरण?
कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात कंपनीच्या कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला होता. तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने  पत्रात केला होता. या पत्रामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी सलिल पारेख संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. 

22 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनावर झालेल्या आरोपानंतर कंपनीच्या शेअर्स 14 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. परिणामी अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणुकदारांचे 45 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. 

दिवसअखेर (ता. 4 ) इन्फोसिसचा शेअर  21रुपयांनी वधारून 709 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 3 लाख 01 हजार 325 कोटींचे बाजारभांडवल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys Says No Prima Facie Evidence On Whistleblower Complaints