एसआयपी टॉप-अप

नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्राधान्यक्रम पर्याय असतो. मात्र, यातील गुंतवणूक रक्कम ही नियमित ‘एसआयपी’मध्ये सारखीच असते.
Investment In mutual fund SIP top-up
Investment In mutual fund SIP top-upsakal
Summary

‘एसआयपी’ सुविधा ही कायम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणारी आहे, तर ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधा ही गुंतवणूकदाराला प्रभावीपणे गुंतवणूक करण्यास मदत करते.

चार्ल्स डार्विन एकदा म्हणाले होते, की जो एखाद्या जागेचा योग्य वापर करेल, तोच या जगात टिकून राहील. हा एक उत्क्रांतीचा प्रसिद्ध सिद्धांत म्हणून ओळखला जातो. मात्र, मनुष्याला उत्क्रांतीचा सिद्धांत समजावून सांगणे जितके अवघड आहे, तितकेच गुंतवणूक रणनिती ठरवणे देखील अवघड आहे, हे मान्य करायला हवे. नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्राधान्यक्रम पर्याय असतो. मात्र, यातील गुंतवणूक रक्कम ही नियमित ‘एसआयपी’मध्ये सारखीच असते. जरी गुंतवणूकदाराचे उत्पन्न वाढले असले तरी त्यात बदल होत नाही. ‘एसआयपी’ सुविधा ही कायम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणारी आहे, तर ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधा ही गुंतवणूकदाराला प्रभावीपणे गुंतवणूक करण्यास मदत करते.

एसआयपी टॉप-अप सुविधा

एसआयपी टॉप-अप सुविधा ही तुम्हाला तुमची मासिक गुंतवणूक रक्कम वाढविण्याची ठराविक कालांतराने सुविधा देते. ज्यात तुम्ही टक्केवारीमध्ये किंवा एक निश्चित रक्कम प्रत्येक वर्षी वाढवू शकता. जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त पैसा असेल तेव्हा ‘टॉप-अप एसआयपी’ हा चांगला पर्याय ठरू शकतो. ही वाढ आधीच्या गुंतवणूक रकमेच्या काही टक्के किंवा एक निश्चित रक्कम जसे, की ५००० रुपये असू शकते. उदाहरणादाखल सांगायचे, तर जर तुम्ही दर महिन्याला १०,००० रुपयांची एसआयपी करीत असाल आणि तुम्हाला त्यात दरमहा १००० रुपये वाढवायचे असतील तर प्रत्येक आर्थिक वर्षाअखेरीस किंवा सहा महिन्यानंतर तुम्ही टॉप-अप सुविधेचा वापर करू शकता. जास्त परतावा मिळवण्यावर लक्ष केंद्रीत न करता तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करू शकता, ज्यामुळे तुमच्या गुंतवणूकवृध्दीस पुरेसा वेळ मिळतो.

एसआयपी टॉप-अपचे फायदे

एसआयपी टॉप-अप म्हणजे गुंतवणूकदार त्याच्या उत्पन्नवाढीच्या प्रमाणात ठराविक अंतराने गुंतवणूक वाढवू शकतो. यात हमखास परतावा मिळेल याची शाश्वती जरी नसली तरी नियोजनबद्ध पद्धतीने काही रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला काढण्याची गुंतवणूकदाराला शिस्त लागते. यातून एखाद्याचे वित्तीय उद्दिष्ट जलदगतीने पूर्ण होऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला या विशिष्ट कालावधीत संपत्ती वाढविता येते. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असल्याने एका वेळेस केलेल्या नोंदणीने गुंतवणूकदारांसाठी बऱ्याच गोष्टी सोप्या-सुटसुटीत झाल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी नोंदणी करण्याबाबत गुंतवणूकदाराला काळजी करण्याचे कारण राहात नाही.

- भूषण वाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com