Investment Planning : फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना कोट्यधीश; जाणून घ्या, कसं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Investment Planning

Investment Planning : फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना कोट्यधीश; जाणून घ्या, कसं?

आज आम्ही तुमच्या अतिशय फायद्याची बातमी घेऊन आलो आहोत. या बातमीमुळे तुमचे फायनांशियल प्लॅनिंग आणि रिटायरमेंटची चिंता दूर होणार आहे. यातून तुम्हाला रेग्चुलर इन्कमही होईल आणि पैशाची अजिबात कमतरता भासणार नाही.

तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (NPS) दुहेरी फायद्यासाठी  एक युक्तीही वापरू शकता. हे अकाउंट तुमच्या पत्नीच्याा नावाने उघडा, यातून काय फायदा होईल, हे समजून घेऊयात. (Investment Planning)

हे ही वाचाच - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

पत्नीच्या नावाने एनपीएस (NPS) खाते उघडल्यानंतर त्यांना वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम मिळेल. दरमहा पेन्शनही दिली जाईल. यामुळे नियमित उत्पन्न म्हणून चांगली रक्कम मिळेल. एनपीएस खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवे आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.

पत्नीच्या नावाने खाते उघडण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तिला या योजनेत 65 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. अशीही ही स्कीम वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. तुम्ही त्यात दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. एनपीएसमधील गुंतवणूक 1,000 रुपयांपासून सुरू होते.

समजा तुमच्या पत्नीचे वय 30 आहे आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांच्या गुंतवणुकीने एनपीएस खाते सुरू केले आहे. जर यावर सरासरी 10% परतावा असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी एकूण रक्कम 1 कोटी 11 लाख 98 हजार 471 रुपये होईल. यातून पत्नीला एकाच वेळी सुमारे 45 लाख रुपये मिळतील.

आता पेन्शनची पाळी, इथे त्याला दरमहा 45,000 रुपये नियमित उत्पन्न म्हणून पेन्शन मिळेल. त्यांना हे पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.

एनपीएसचे कॅलक्युलेशन समजून घेऊयात.

वय - 30 वर्ष
गुंतवणूक - 30 वर्ष
मंथली काँट्रीब्यूशन- 5,000 रुपये
अंदाजे रिटर्न - 10%
एकूण फंड- 1,11,98,471 रुपये (मॅच्युरिटीनंतर)
44,79,388 रुपये ऍन्युअटी प्लान खरेदी करण्याची रक्कम
67,19,083 रुपये (ऍन्युअटी रेट 8 टक्के)
मंथली पेन्शन - 44,793 रुपये

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :PensionschemesInvestment