esakal | सेन्सेक्स गडगडाला ; गुंतवणूकदारांना तीन लाख कोटींचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex

देशव्यापी लॉकडाऊनमध्ये होत असलेली वाढ आणि केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या उपयुक्ततेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिनयाने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजारात विक्रीचा मारा केला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1 हजार 68 अंशांच्या घसरणीसह 30 हजार 028 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 313 अंशांची घसरण झाली. तो 8 हजार 823 पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्स गडगडाला ; गुंतवणूकदारांना तीन लाख कोटींचा फटका

sakal_logo
By
पीटीआय

* सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 1 हजार 68 अंशांच्या घसरण
* राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 313 अंशांची घसरण 
* कच्चे तेल वधारले
* विकासदर उणे होण्याची शक्यता

मुंबई - देशव्यापी लॉकडाऊनमध्ये होत असलेली वाढ आणि केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या उपयुक्ततेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिनयाने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजारात विक्रीचा मारा केला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1 हजार 68 अंशांच्या घसरणीसह 30 हजार 028 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 313 अंशांची घसरण झाली. तो 8 हजार 823 पातळीवर बंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा  

आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांना तीन लाख कोटींचा फटका बसला. गेले सलग पाच दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांना दिलासा देणारे 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. मात्र उद्योगांना थेट आर्थिक मदत न मिळाल्याने उद्योगांची निराशा झाली आहे.

जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कोरोनावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याने जगभरातील  गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिओची गुंतवणुकीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच

क्षेत्रीय पातळीवर ऑटोमोबाईल, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बॅंकिंग, धातू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअरमध्ये तेजी होती.

सेन्सेक्सच्या मंचावर आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये 3.44 टक्क्यांची घसरण झाली. बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. तर सिप्ला, इन्फ्राटेल, इन्फोसिस, ब्रिटानिया आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर वधारून बंद झाले.

सोन्याने गाठली आतापर्यंतची उच्चांक पातळी; चांदीलाही लकाकी!

कच्चे तेल वधारले -
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. लॉकडाऊन काढत अनेक देशांमधील आर्थिक व्यवहारांना सुरूवात होण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे.

विकासदर उणे होण्याची शक्यता -
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत असून अनेक देश आर्थिक संकटात सापडले आहेत.
 जपानने पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले असल्याचे सांगितले आहे. तर भारताचा चालू वर्षाचा विकासदर उणे राहण्याची शक्यता काही पतमानांकन  संस्थांनी व्यक्त केला आहे.