जिओची गुंतवणुकीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच

वृत्तसंस्था
Monday, 18 May 2020

भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी जिओमध्ये जनरल अटलांटिक या कंपनीने 6 हजार 598 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओमध्ये सलग चौथ्या आठवड्यात झालेली ही मोठी गुंतवणूक आहे.  जनरल अटलांटिक आता जिओ प्लॅटफॉर्ममधील 1.34 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. जनरल अटलांटिकची आशियाई देशातील कंपनीतील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. 

जिओमध्ये जनरल अटलांटिक 6 हजार 598 कोटींची गुंतवणूक करणार
मुंबई - भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी जिओमध्ये जनरल अटलांटिक या कंपनीने 6 हजार 598 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओमध्ये सलग चौथ्या आठवड्यात झालेली ही मोठी गुंतवणूक आहे.  जनरल अटलांटिक आता जिओ प्लॅटफॉर्ममधील 1.34 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. जनरल अटलांटिकची आशियाई देशातील कंपनीतील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

सलग चौथ्या आठवड्यात जिओमध्ये झालेल्या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये परदेशी कंपन्यांनी एकूण 67 हजार 194.75 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत जिओने चार कंपन्यांना गुंतवणुकीतून  14.8 टक्के हिस्सा विकला आहे. जिओ प्लॅटफॉर्म ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीची सहाय्यक कंपनी आहे. भारतातील आघाडीची "नेक्स्ट जनरेशन" तंत्रज्ञान कंपनी बनली आहे.

सोन्याने गाठली आतापर्यंतची उच्चांक पातळी; चांदीलाही लकाकी!

जिओमध्ये महिन्याभरात 67 हजार194.75 कोटींची गुंतवणूक
-फेसबुक: 43 हजार 574 कोटी रुपये 
- विस्टा इक्विटी पार्टनर्स: 11 हजार 367 कोटी रुपये
-सिल्व्हर लेक: 5 हजार 655 कोटी रुपये
जनरल अटलांटिक: 6 हजार 598 कोटी

प्रतिक्रिया
रिलायन्स इंडस्ट्रीजचे ​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, 
 “ग्लोबल इंडिस्ट्रिजचे व्हॅल्यू पार्टनर म्हणून मी स्वागत करतो. जनरल अटलांटिकला भारतावर आणि आमच्या डिजिटल व्हिजनवर विश्वास आहे.जनरल अटलांटिकचे जागतिक कौशल्य आणि 40 वर्षांचा तांत्रिक गुंतवणूकीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड  म्हणाले, "जिओ एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. दूरदर्शी उद्योजकांचे दीर्घकालीन समर्थक म्हणून आम्ही जिओमध्ये गुंतवणूक करण्यास उत्साही आहोत." डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते आणि देशाच्या विकासाला गती मिळू शकते असा आमचा  विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio raises ANOTHER 6,598 crore rupees investment