29 सप्टेंबरला खुला होईल स्वस्तिक पाईप्सचा आयपीओ

प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल. हे शेअर्स बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जारी केले जातील.
IPO
IPOgoogle

मुंबई : स्पेशलाइज्ड पाइप बनवणारी कंपनी स्वस्तिक पाईप्स लिमिटेडचा आयपीओ (IPO) गुरुवार, 29 सप्टेंबर रोजी उघडेल आणि सोमवार, 3 ऑक्टोबरला बंद होईल. कंपनीने आपल्या आयपीओसाठी 97 ते 100 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला आहे.

स्वस्तिक पाईप्सची आयपीओद्वारे 62.51 लाख शेअर जारी करण्याची योजना आहे. आयपीओची साईज 62.51 लाख शेअर्सची असेल आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल. हे शेअर्स बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जारी केले जातील.

स्वस्तिक पाईप्स 1973 पासून माइल्ड स्टील आणि कार्बन स्टील इलेक्ट्रिक-रेझिस्टन्स-वेल्डेड ब्लॅक आणि गॅल्वनाइज्ड पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि निर्यात करण्याच्या व्यवसायात आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याेचे 2 प्लांट्स आहेत. संदीप बन्सल, अनुपमा बन्सल, शाश्वत बन्सल आणि गीता देवी अग्रवाल हे त्याचे प्रमोटर आहेत.

स्वस्तिक पाईप्सने गेल्या काही वर्षांत आपल्या व्यवसायात विविधता आणली आहे आणि आता सौर मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर्स, ट्रान्समिशन टॉवर्स, स्टील ट्युब्युलर पोल आणि रेल्वे, फॉर्मवर्क आणि क्रॅश बॅरियर्स बनवते.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 20.41 कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षात 1.48 कोटी रुपये होता. त्याच वेळी, कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्षातील 522.17 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये वाढून 608.7 कोटी रुपये झाला.

आयपीओपैकी सुमारे 40 टक्के पात्र क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIBs), 20 टक्के हाय नेट वर्थ इंडिविजुअल्ससाठी (HNIs) आणि 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

कंपनीने कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला या इश्यूसाठी लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून स्कायलाइन फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com