इराणकडून होणारी तेल आयात घटली

Oil
Oil

नवी दिल्ली - अमेरिकेने इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यास मज्जाव केल्यानंतर भारताने या देशाकडून होणारी आयात लक्षणियरीत्या घटवली आहे. एप्रिल महिन्यातील आकडेवारीनुसार, इराणकडून झालेली खनिज तेलाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७ टक्‍क्‍यांनी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एप्रिल महिन्यात इराणकडून प्रतिदिन सुमारे २,७७,६०० बॅरल खनिज तेलाची आयात झाली असून, ती मार्च महिन्याच्या तुलनेत ३१.५ टक्‍क्‍यांनी कमी आहे. जानेवारी ते एप्रिलदरम्यान सरासरी आयात सुमारे ४५ टक्‍क्‍यांच्या घसरणीसह प्रतिदिन ३,०४,५०० बॅरल राहिली. गतवर्षी याच कालावधीत ती ५,५२,००० बॅरल इतकी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com