IRFC Share Price : गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी; भारतीय रेल्वेच्या शेअरमध्ये झाली घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IRFC Share Price

IRFC Share Price : गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी; भारतीय रेल्वेच्या शेअरमध्ये झाली घसरण

आज इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) शेअर्सची घसरण झाली आहे. IRFC च्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची ही एक चांगली संधी असू शकते. कारण IRFC चे शेअर्स आज जरी घसरले असले तरी येणाऱ्या काळात ते चांगला रिटर्न देऊ शकतील.

स्टॉकमध्ये सध्या10 ते 15 टक्के रिटर्न मिळण्याची क्षमता आहे. शेअर 32 रुपयांच्या खाली घसरल्यावर त्यामध्ये गुंतवणुक करणे योग्य आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

सरकार काही मोठ्या पायाभूत सुविधा गुंतवणुकीची घोषणा करू शकेल, अशी अपेक्षा अर्थसंकल्पातून आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणुक करणे भविष्यासाठी चांगले आहे. आतापर्यंत या शेअरने चांगला कल दाखवला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

IRFC शेअरच्या किंमतीचा इतिहास

IRFC ने गेल्या 6 महिन्यांत सुमारे 60 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे, परिणामी गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली आहे. YTD, IRFC ने 44 टक्के सकारात्मक परतावा दिला आहे. 3 जानेवारीला 23.05 रुपये उपलब्ध असलेला IRFC स्टॉक आता सुमारे 43.82 रुपयांना उपलब्ध आहे. सध्याच्या पातळीवर, स्टॉकचे मार्केट कॅप 43.39 हजार कोटी रुपये आहे.

IRFC ने जानेवारी 2021 मध्ये 26 रुपयांच्या IPO इश्यू किंमतीने शेअर बाजारात पदार्पण केले. IRFC ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

हेही वाचा: RBI चा १३ बँकांना दणका! महाराष्ट्रातील 'या' बँकांचा समावेश; वाचा काय आहे कारण?

कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल सुमारे 24 टक्क्यांनी वाढून Q2FY23 मध्ये 5,810 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 4,690 कोटी रुपये होता. कंपनीची निव्वळ संपत्ती रु. 43,549 कोटी आणि मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) Q2 मध्ये रु. 4,39,070 कोटी होती, IRFC ने निकाल दाखल करताना ही माहिती दिली.

टॅग्स :Share MarketInvestment