तुम्ही करदाते आहात? मग 'हे' महत्वाचे काम लगेच करा, उद्या शेवटची तारीख

itr verification last date alert for taxpayers last date of e verification check process here
itr verification last date alert for taxpayers last date of e verification check process here

ITR Verification Last Date : प्राप्तिकर खात्याने करदात्यांना (Taxpayers) प्राप्तिकर विवरणपत्रांचे (Income Tax Return) व्हेरिफिकेशन/ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी नोटीस जारी केली आहे. प्राप्तिकर विभागाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्नच्या व्हेरिफिकेशन/ई-व्हेरिफिकेशनसाठीची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता आयकर विभागाने ट्विटद्वारे करदात्यांना या मुदतीची आठवण करून दिली आहे.

जोपर्यंत करदात्यांची आयटीआर व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत ITR दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जात नाही. जर आयटीआर वेळेवर भरला गेला असेल परंतु आयटीआर व्हेरिफाय केला नसेल, तर आयटीआर फाइल करण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही.

आयकर रिटर्न व्हेरिफाय कसा कराल (How to Verify ITR)

तुम्ही तुमचा आयटीआर चे ऑनलाइन तसेच ऑफलाइन व्हेरिफिकेशन/ई-व्हेरिफिकेशन करू शकता. तुमचा आयटीआर ई-फायलिंग वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, आयटी विभाग तुम्हाला तुमचा आयटीआर व्हेरिफाय करण्यासाठी 120 दिवसांचा अवधी देतो. जर ते त्या दिवसात पूर्ण झाले नाही, तर आयटी कायद्यानुसार तुमचा कर भरणे (Tax Filing) अवैध होईल.

itr verification last date alert for taxpayers last date of e verification check process here
Nokia चे 3 स्वस्त स्मार्टफोन, 60 तास चालणारे वायरलेस हेडफोन लॉंच

या 6 पद्धतींच्या मदतीने, ITR व्हेरिफाय करता येतो...

1. बँक खात्याच्या मदतीने

2. नेट बँकिंगद्वारे

3. आधार OTP द्वारे

4. डीमॅट खात्याद्वारे

5. ATM च्या मदतीने

6. ऑफलाइन पद्धत

itr verification last date alert for taxpayers last date of e verification check process here
एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन, दररोज 2GB डेटा, Disney + Hotstar देखील

ITR E-Verify कसे करावे

  • तुमच्या ई-फायलिंग खात्याच्या एक्सेस साठी https://www.incometax.gov.in वर जा.

  • ई-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवरील 'ई-व्हेरिफाय रिटर्न' Quick Links वर क्लिक करा.

  • यानंतर पॅन, असेसमेंट वर्ष इत्यादी आवश्यक माहिती भरा.

  • आता 'e-verify' वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला तुमचा ई-व्हेरिफिकेशन कोड (EVC) जनरेट होईल.

itr verification last date alert for taxpayers last date of e verification check process here
युक्रेनला मस्क यांच्याकडून मदत, सुरू केली सॅटेलाईट इंटरनेट सेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com