युक्रेनला मस्क यांच्याकडून मदत, सुरू केली सॅटेलाईट इंटरनेट सेवा

Russia invasion elon musk help Ukraine for internet services activate starlink satellite data services
Russia invasion elon musk help Ukraine for internet services activate starlink satellite data services
Updated on

सध्या रशियाच्या हल्ल्याचा सामना करत असलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) पुढे सरसावला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले असून जिथे कालपर्यंत गोळीबार होत होता, आता तो बॉम्बस्फोट होत आहेत. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. हवाई हल्ले आणि बॉम्बस्फोटांमुळे देशातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे, त्यात इंटरनेट देखील एक आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे पहिले उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह (Mykhailo Fedorov) यांनी ट्विटरच्या माध्यमातून एलन मस्क यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर एलन मस्क युक्रेनला सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचे मान्य केले.

अब्जाधीश एलन मस्क यांचीची स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रदाता (Starlink Satellite Internet Service Provider) कंपनी आहे. जगभरातील बहुतांश इंटरनेट सेवा भूमिगत केबलद्वारे पुरवल्या जातात. रशियाकडून हल्ले होत असलेल्या युक्रेनमध्ये बॉम्बस्फोट आणि स्फोटांसोबतच सायबर हल्लेही होत आहेत. देशातील इंटरनेट सेवांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे शनिवारी युक्रेनचे व्हॉईस पंतप्रधान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी इलॉन मस्क यांना ट्विटर पोस्टद्वारे मदतीचे आवाहन केले.

फेडोरोव्ह यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे , "मस्क, तुमचे रॉकेट अवकाशातून पृथ्वीवर यशस्वीपणे उतरत असताना, रशियन रॉकेट युक्रेनच्या सामान्य नागरिकांवर हल्ले करत आहेत. आम्ही तुम्हाला स्टारलिंक स्टेशन उपलब्ध करून देण्याची विनंती करतो जेणेकरून आम्हाला रशियाच्या हल्ल्याचा सामना करता येईल."

एलन मस्क यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेतला आणि युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला. "स्टारलिंकची इंटरनेट सेवा आता युक्रेनमध्ये कार्यान्वित झाली आहे. लवकरच आणखी बरेच टर्मिनल सक्रिय केले जात आहेत," त्यांनी मायखाइलो फेडोरोव्ह यांना उत्तर देताना मस्क यांनी लिहिले.

Russia invasion elon musk help Ukraine for internet services activate starlink satellite data services
युक्रेन धुमसतंय; खार्किवमध्ये गॅस पाईपलाइन, ऑइल डेपोवर क्षेपणास्त्र हल्ले

एलन मस्क यांची कंपनी SpaceX गेल्या अनेक वर्षांपासून स्टारलिंकच्या माध्यमातून सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचे काम करत आहे. कंपनीने आतापर्यंत सुमारे 2000 उपग्रह अवकाशात सोडले आहेत, जे सतत पृथ्वीभोवती फिरतात आणि पृथ्वीवर सुपरफास्ट इंटरनेट सेवा देण्यासाठी पृथ्वीच्या कमी कक्षेत फिरतात.

रशियाकडून युक्रेनवर हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात रशियाने आतापर्यंत 14 विमाने, 8 हेलिकॉप्टर, 102 टँक आणि 1 BUK क्षेपणास्त्र गमावले आहे. या काळात 3 हजारांहून अधिक जवान शहीद झाले आहेत. रशियाने युक्रेनच्या कीव, सुमी, मारियुपोल आणि पोल्टावाला हवाई हल्ले आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करून लक्ष्य केले आहे जे अजूनही सुरू आहे.

Russia invasion elon musk help Ukraine for internet services activate starlink satellite data services
युक्रेनमध्ये तिरंगा बनला भारतीयांची ढाल; रशियन सैनिकांनीही केला सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com