Budget 2023 : तुम्हाला माहितीय का? टोपी विकणाऱ्या व्यक्तीने सादर केला होता पहिला अर्थसंकल्प | Union Budget History | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Union Budget 2023 History

Budget 2023 : तुम्हाला माहितीय का? टोपी विकणाऱ्या व्यक्तीने सादर केला होता पहिला अर्थसंकल्प

Union Budget History : फार कमी लोकांना याची माहिती असेल आणि हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या व्यक्तीने देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला तो एक साधा टोपी विकणारा होता.

भारताच्या अर्थसंकल्पाचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा जुना आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाला, तर पहिला अर्थसंकल्प त्या अगोदर काही वर्षांपूर्वी म्हणजे 1860 मध्ये सादर करण्यात आला होता.

पुढील महिन्याच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करणार आहेत. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला असेल. त्याचा इतिहास काय असेल. याबद्दल जाणून घेऊयात.

देशाचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन नावाच्या स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञाने मांडला होता. तो टोपी विकणाऱ्या कुटुंबातील होता.

James Wilson

James Wilson

जेम्स विल्सन स्वतः लहानपणी हेच काम करत असत, पण त्यांच्या विलक्षण बुद्धीमत्तेमुळे ते त्यांच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचले की, त्यांना देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

जेम्स विल्सनबद्दल असे सांगितले जाते की, त्यांना अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयात रस होता. 1860 मध्ये जेम्स विल्सन हे भारतीय परिषदेचे वित्त सदस्य होते.

देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यासोबतच जेम्स विल्सन यांचे नाव चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संस्थापक म्हणूनही घेतले जाते.

हेही वाचा: SEBI: सेबीने 'या' कंपनीला ठोठावला 26 कोटींचा दंड, 45 दिवसांच्या आत कंपनीला...

जेम्स विल्सन यांची गणना इतिहासातील महान अर्थशास्त्रज्ञांमध्ये केली जाते. त्यांचे अद्भूत ज्ञान पाहून भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी त्यांची नियंत्रण मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. जेम्स यांनी 1860 मध्ये या जगाचा निरोप घेतला.