अनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महाग 

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

ग्राहकांना आता 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 434.71 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सरकारने अनुदानाचा भार कमी करण्यासाठी जुलै महिन्यात सिलिंडरच्या किंमती दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली - अनुदानित सिलिंडरच्या दरात सलग आठव्या महिन्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच, जेट इंधनाच्या दरातदेखील 8.6 टक्क्यांची मोठी वाढ करण्यात आली आहे. 

ग्राहकांना आता 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 434.71 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सरकारने अनुदानाचा भार कमी करण्यासाठी जुलै महिन्यात सिलिंडरच्या किंमती दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याआधी 1 डिसेंबर रोजी एलपीजीचे दर 2.07 रुपयांनी वाढविण्यात आले होते. 

यासोबतच, 14 सिलिंडरची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर खरेदी करण्यात येणाऱ्या अनुदानित सिलिंडरची किंमत एक रुपयाने वाढविण्यात आली आहे. अनुदानित सिलिंडरची रक्कम 585 रुपये एवढी झाली आहे. याआधी 1 डिसेंबरला या किंमतीत 54.5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 

त्याचप्रमाणे, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल अर्थात जेट इंधनाची किंमत 52,540.63 रुपये प्रति किलोलीटरएवढी झाली आहे. गेल्या महिन्यात या किंमतीमध्ये 3.7 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

Web Title: Jet fuel price hiked by 8.6%; subsidised LPG Rs 2 a cylinder