esakal | "जिओ'ची बल्ले बल्ले, गुंतवणुकीचा पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Jio

रिलायन्स जिओमध्ये परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये सात  मोठ्या परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली होती. गेल्या 47 दिवसांच्या आत रिलायन्स जिओमध्ये एकूण 97 हजार 885.65 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

"जिओ'ची बल्ले बल्ले, गुंतवणुकीचा पाऊस

sakal_logo
By
वृत्तसंस्था

फक्त दोन महिन्यात आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून एकूण 97,885.65 कोटींची गुंतवणूक


रिलायन्स जिओमध्ये परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये सात  मोठ्या परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली होती.

 नुकतीच अबुधाबीची ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’ जिओमध्ये गुंतवणूक केली असताना अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (एडीआयए) 5 हजार 683.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी  जिओ प्लॅटफॉर्मची 1.16 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. 

गेल्या 47 दिवसांच्या आत रिलायन्स जिओमध्ये एकूण 97 हजार 885.65 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


कोणी किती केली गुंतवणूक?

- फेसबुक ः 43 हजार 574 कोटी रुपये ------ 9.99 टक्के (22 एप्रिल)

- सिल्व्हर लेक ः

5 हजार 655 कोटी रुपये
4 हजार 546.89 कोटी रुपये-----  2.08 टक्के (3 मे व 5 जून)

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका


- व्हिस्टा ः 11 हजार 367 कोटी रुपये -------- 2.32 टक्के (8 मे)

- जनरल अटलांटिक ः6 हजार 598 कोटी रुपये---------- 1.34 टक्के (17 मे)


- केकेआर ः11 हजार 367 कोटी रुपये------- 2.32 टक्के (22 मे)


- मुबादला ः 9 हजार 93 कोटी रुपये-------1.85 टक्के (5 जून)


- अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी -------1.16 टक्के (7 जून)

किती जमवला पैसा?

अवघ्या सात व्यवहारांमधून उभा राहिलेला पैसा ः रु. 97 हजार 885.65 कोटी

जिओ इन्फोकॉम ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी आहे. कंपनीने  2016 च्या अखेरीस सुरू झालेल्या प्रवासापासून आतापर्यंतची ग्राहकसंख्या 38 कोटी 80 लाखांवर पोचली आहे.

 टाटा समूहाची, व्होल्टास लि. उभारणार दक्षिण भारतात नवा प्रकल्प

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, 
" चार दशकांच्या गुंतवणुकीच्या यशाचा ट्रॅक रेकॉर्ड असलेली 'एडीआयए' जिओशी भागीदारी करत आहे याचा मला आनंद होतो आहे. भारत एडडीआयएसाठी डिजिटल नेतृत्त्व आणि सर्वसमावेशक विकासाच्या संधी निर्माण करणार आहे.''