esakal | घरबसल्या IPL चा आनंद घेण्यासाठी Jio ने लॉन्च केला खास क्रिकेट प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

Jio, Ipl20

युएईत प्रेक्षकांशिवाय रंगणाऱ्या स्पर्धेचा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद घेता यावा यासाठी मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी खास प्लॅन लॉन्च केले आहेत.

घरबसल्या IPL चा आनंद घेण्यासाठी Jio ने लॉन्च केला खास क्रिकेट प्लॅन

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई : आयएलच्या तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या प्रादुरभावामुळे स्पर्धेतील वेळापत्रक कोलमडल्यानंतर नव्या नियोजनानंतर स्पर्धेला सुरुवात होत आहे. युएईत प्रेक्षकांशिवाय रंगणाऱ्या स्पर्धेचा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद घेता यावा यासाठी मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी खास प्लॅन लॉन्च केले आहेत. Jio ने आगामी आयपीएल स्पर्धा लक्षात घेऊन आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन लॉन्च केल्याची घोषणा केली. यामध्ये   डेटा आणि व्हाइस कॉलिंगसोबत 1 वर्षांसाठी के डिज्नी + हॉटस्टार VIP  सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे.   ल.

बिहारच्या विकासात भाजपही वाटेकरी; नितीश यांना श्रेय न जाऊ देण्याची खबरदारी

Jio मध्ये 1 महिन्यांपासून ते 1 वर्षांपर्यंतचे प्लॅन उपलब्ध आहेत. प्लॅनची वैधता कितीही असली तरी डिज्नी+ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन संपूर्ण एक वर्षांसाठी मिळणार आहे. 
Jio क्रिकेट प्लॅनमध्ये  401 रुपये पासून ते  2599 रुपयांपर्यंतचे पॅक उपलब्ध आहेत.   28 दिवसांची वैधता असणाऱ्या  401 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रतिदिन 3 जीबी डेटा मिळतो. 598 रुपयांचा प्लॅन हा  56 दिवसांची वैधता आणि प्रतिदिन 2 जीबी डेटा तर  777 रुपयांसह 84 दिवसांच्या वैधतेसह  1.5 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एअरटेल

ड्रीम 11 आयपीएलसाठी  एअरटेलने 599 रुपयांत  एक वर्षांसाठी डिज्नी+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री देण्याची ऑफर आणली आहे. 56 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना प्रतिदिन  2 जीबी डेटा ऑफर करत आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचाही यात समावेश आहे.  

vodafone

vodafone ने आयपीएलसाठी काही खास प्लॅन दिलेले नाही. या सेवेचा लाभ घेणाऱ्यांना कंपनीकडे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्लॅनचे सब्सक्रिप्शन घेऊन आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचा आनंद घ्यावा लागेल.  
(Disclaimer: कंपनी आपल्या प्लॅनमध्ये कोणत्याही वेळी बदल करु शकते. त्यामुळे यासंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही कस्टमर केअरमध्ये कॉल करुन अधिक माहिती जाणून घेऊ शकता)