मंदीमुळे रोजगार निर्मितीत घट; 16 लाख नोकरीच्या संधी गमावल्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

देशातील मंदीसदृश परिस्थितीचा मोठा फटका रोजगारनिर्मितीवर झाला असून चालू आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 16 लाख रोजगार कमी झाले आहेत.

देशातील मंदीसदृश परिस्थितीचा मोठा फटका रोजगारनिर्मितीवर झाला असून चालू आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 16 लाख रोजगार कमी झाले आहेत. एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मागील वर्षी एकूण 89.7 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. देशातील बहुसंख्य तरुणांना राजुगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या 15 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळत असलेली क्षेत्रे आणि सरकारी नोकऱ्या यांचा विचार या अहवालात करण्यात आला आहे.

मायकल पात्रा यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी निवड

या अहवालानुसार महाराष्ट्र,  गुजरात आणि पंजाब या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे. परिणामी नोकरी निमित्ताने आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा सारख्या राज्यांमधून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांकडून  घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत देखील मोठी घट झाल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न आणि ग्राहकांची खरेदीशक्ती ही येत्या काही काळासाठी अपेक्षेपेक्षा देखील कमीच राहिला असे देखील बँकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांच्या नैतृत्वाखाली तयार केलेल्या अहवालात म्हणटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: job creation has reduced by 16 lakhs due to Inflation