esakal | एप्रिलपेक्षा जूनमधील आर्थिक वाटचाल अधिक खडतर : गीता गोपीनाथ, मुख्य आर्थिक सल्लागार, आयएमएफ
sakal

बोलून बातमी शोधा

Gita-Gopinath

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा जगभरात मोठा विपरित परिणाम होईल आणि यातून जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्याबाबत फारच अनिश्चितता निर्माण झाली आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य आर्थिक सल्लागार गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे.

एप्रिलपेक्षा जूनमधील आर्थिक वाटचाल अधिक खडतर : गीता गोपीनाथ, मुख्य आर्थिक सल्लागार, आयएमएफ

sakal_logo
By
पीटीआय

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा जगभरात मोठा विपरित परिणाम होईल आणि यातून जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्याबाबत फारच अनिश्चितता निर्माण झाली आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य आर्थिक सल्लागार गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोविड-१९ महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था ३ टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवली होती. आगामी काळासाठीचा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वर्तवला जाण्याची शक्यता आहे. त्यात जून महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेचे चित्र आणखी गंभीर होत जाण्याची चिन्हे आहेत, असेही पुढे गीता गोपीनाथ म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थव्यवस्था रुळावर येण्यासंदर्भात कमालीची अनिश्चितता आहे, असे सातव्या आशियाई पतधोरण परिषदेत ऑनलाईन भाषण करताना गीता गोपीनाथ म्हणाल्या. जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्यासंर्भात सर्वांनाच चिंता वाटते आहे. वाहतूकीसारख्या काही क्षेत्रांना आधीच याचा मोठा फटका बसला आहे. त्यात  दिवाळखोरीची वाढती प्रकरणे, वाढती बेरोजगारी आणि ग्राहकांच्या मानसिकतेतील अनपेक्षित बदल या बाबी लक्षात घेऊनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे. या विविध घटकांमुळे मोठे लक्षणीय गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही पुढे गीता गोपीनाथ म्हणाल्या. या सर्व बाबींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान भरून न येणारे असेल अशी भीती गोपीनाथ यांनी व्यक्त केली आहे. 

पेट्रोल, डिझेल दरात सात दिवसांत ४ रुपयांची वाढ

याआधी एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भातील आपला अंदाज व्यक्त करताना जर कोविड-१९ चा प्रादूर्भाव वाढत गेला तर अर्थव्यवस्थेवर होत जाणारे परिणाम आणखी गंभीर स्वरुपाचे असतील, असे म्हटले होते. मागील आठवड्यात जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना जागतिक बॅंकेने जागतिक अर्थव्यवस्थेत ५.२ टक्क्यांची घट होण्याची शक्यता व्यक्त केली होती. जर असे झाले तर मागील १५० वर्षांतील हे सर्वात मोठे आर्थिक संकट ठरणार आहे.

आर्थिक स्थैर्यासाठी लक्षात घ्या या '७' टिप्स

गीता गोपीनाथ या २०१९ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदावर कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी केरळच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे.

loading image