आर्थिक स्थैर्यासाठी लक्षात घ्या या '७' टिप्स

विजय तावडे
Saturday, 13 June 2020

आर्थिक स्थैर्य हे प्रत्येकासाठीच आवश्यक असते. बहुतांश वेळा आर्थिक विषयाशी संबंधित चुकीचे निर्णय किंवा या विषयाची चुकीची हाताळणी आर्थिक अडचणी निर्माण करत असते. तुम्ही कोणत्याही पातळीवर किंवा स्तरावर असलात तरी काही मूलभूत बाबी किंवा सूत्रे ही समानच असतात. आर्थिक स्थैर्यासाठीची अशीच काही अर्थ सूत्रे आपण लक्षात घेऊया.

आर्थिक स्थैर्य हे प्रत्येकासाठीच आवश्यक असते. बहुतांश वेळा आर्थिक विषयाशी संबंधित चुकीचे निर्णय किंवा या विषयाची चुकीची हाताळणी आर्थिक अडचणी निर्माण करत असते. तुम्ही कोणत्याही पातळीवर किंवा स्तरावर असलात तरी काही मूलभूत बाबी किंवा सूत्रे ही समानच असतात. आर्थिक स्थैर्यासाठीची अशीच काही अर्थ सूत्रे आपण लक्षात घेऊया,

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१. तुमच्या पात्रतेनुसार उत्तम कमवा आणि तुमच्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा
आयुष्यात आर्थिक पातळीवर हे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली क्षमता आणि कौशल्ये ओळखून बाजारातील तुमची पत लक्षात घ्या. त्यानुसार जास्तीत जास्त वेतन मिळवण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर तुमच्या उत्पन्नाइतकाच तुमचा खर्चदेखील महत्त्वाचा असतो. अन्यथा तुम्ही कितीही पैसा कमावला आणि खर्च जर उत्पन्नापेक्षा अधिक असला तर तुम्ही आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असते.

शेअर बाजार सावरला, दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले

२. महिन्याचे बजेट
दर महिन्याला तुमचे बजेट आखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची योग्य ती कल्पना येते. तुमचे कष्टाने कमावलेले पैसै नेमके कुठे आणि किती प्रमाणात खर्च होत आहेत हे लक्षात आल्यावरच तुम्ही भविष्यासाठी बचत करू शकता. दर महिन्याला छोटीशी वाटणारी रक्कम भविष्यात मोठा लाभ मिळवून देऊ शकते.

पिपल्स कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध

३. क्रेडिट कार्डाची बिले  वेळेवर भरा
क्रेडिट कार्डाची थकित बिले हा एक खूप मोठा ट्रॅप आहे. क्रेडिट कार्डाचा वापर करून खर्च करताना आपल्याला मोठी सवलत मिळत असते. मात्र खर्च केलेल्या रकमेचे बिल वेळेवर भरणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रेडिट कार्डाची थकलेली बिले मोठ्या व्याजदराने दंड आकारतात. त्यामुळे आपण प्रत्यक्ष खर्च केलेल्या रकमेपैकी खूप जास्त रक्कम भरण्याची वेळ आपल्यावर येते. आर्थिक स्थैर्यासाठी या ट्रॅपमध्ये न अडकणे हे महत्त्वाचे ठरते.

महिंद्रा अँड महिंद्राला ३,२५५ कोटींचा तोटा

४. निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन
तरुणपणी आपण नियमित उत्पन्न कमावत असतो. त्यामुळे खर्च अधिक झाला तरी त्यातून मार्ग काढता येतो. मात्र निवृत्तीनंतर किंवा उतार वयात आपले उत्पन्न थांबणार असते. कारण आपण सेवानिवृत्त होणार असतो. सर्वांनाच पेन्शन असते असे नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी तरुण वयातच आर्थिक नियोजन आणि तरतूद करणे श्रेयस्कर ठरते. करियरच्या सुरूवातीलाच या दृष्टीने आखणी केल्यास छोट्या रकमेने मोठ्या कालावधीत चांगली रक्कम उभी करता येते. 

महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव

५. बचत आणि गुंतवणूक
दर महिन्याच्या उत्पन्नातून ठराविक रकमेची बचत करणे अत्यावश्यक आहे. यासाठी खर्चाला आळा घालत नियमितपणे ठराविक रकमेची बचत केलीच पाहिजे. बचत केलेल्या रकमेची योग्य त्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. यातून संपत्ती निर्माण होते. बचत आणि गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी वाढवत नेली पाहिजे. त्यामुळे वाढलेल्या उत्पन्नाबरोबरच बचत आणि गुंतवणूकदेखील वाढत जाते. संपत्ती निर्मितीसाठीचे अत्यंत महत्त्वाचे असे हे सूत्र आहे.

६. विमा संरक्षण
योग्य असा आयुर्विमा आणि आरोग्य विमा असणे ही काळाची गरज आहे. आपल्या गरजांनुसार योग्य रकमेचे आयुर्विमा संरक्षण आणि आरोग्य विमा संरक्षण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटापासून वाचवू शकते. विम्याचे हफ्ते नियमितपणे भरा. पॉलिसी रद्द होणार नाही याची नेहमी काळजी घ्या.

७. जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक
गुंतवणूक करताना मोहाला बळी पडून जास्त किंवा अवाजवी परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेत आपले वय, उत्पन्न, जोखीम क्षमता लक्षात घेऊनच विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tips for financial stability