पेट्रोल, डिझेल दरात सात दिवसांत ४ रुपयांची वाढ

पीटीआय
Saturday, 13 June 2020

देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये डिझेलचे दर ५८ पैसे प्रति लिटरने तर पेट्रोलचे दर ५९ पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.

देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये डिझेलचे दर ५८ पैसे प्रति लिटरने तर पेट्रोलचे दर ५९ पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील सात दिवसांत डिझेलचे दर ४ रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. तर पेट्रोलचे दर ३.९० रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ७५.१६ रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत, तर डिझेलचे दर ७३.३९ रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत. मुंबईत शुक्रवारी ८२.१० रुपये प्रति लिटरवर असणारे पेट्रोलचे दर शनिवारी वाढून ८३.१० रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत, तर डिझेलचे दर ७१.४८ रुपये प्रति लिटरवरून वाढून ७२.०३ रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत.

आर्थिक स्थैर्यासाठी लक्षात घ्या या '७' टिप्स

संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक राज्यातील व्हॅट आणि इतर स्थानिक करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दर वेगवेगळे आहेत. मार्च महिन्यात केंद्र सरकारने अतिरिक्त निधी जमवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली होती. 

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांनी इंधनाच्या उत्पादन करातील वाढीची जोडणी आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणाऱ्या कच्च्या तेलाशी केली होती.

अनिल अंबानींकडून १,२०० कोटींच्या वसूलीसाठी स्टेट बॅंकेची एनसीएलटीकडे धाव 

पेट्रोल आणि डिझेलचे चार महानगरामधील दर पुढीलप्रमाणे,
महानगर          पेट्रोल                                 डिझेल

दिल्ली :            ७५.१६ रुपये प्रति लिटर        ७३.३९ रुपये प्रति लिटर
मुंबई :             ८२.१० रुपये प्रति लिटर         ७२.०३ रुपये प्रति लिटर
कोलकाता :     ७७.०५ रुपये प्रति लिटर         ६९.२३ रुपये प्रति लिटर
चेन्नई :             ७८.९९ रुपये प्रति लिटर         ७१.६४ रुपये प्रति लिटर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh consecutive day hike in Fuel prices