कल्पतरु पॉवरचा शेअर नऊ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई: कल्पतरु पॉवर ट्रान्समिशनला पश्चिम अफ्रिकेतून कंत्राट मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरने तब्बल नऊ वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे. कंपनीला पश्चिम अफ्रिकेत ट्रान्समिशन लाईनच्या बांधकामाचे तब्बल 737 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. याशिवाय, कंपनीला हरियाणा विद्युत प्रसारण निगमकडून 220 केवी सबस्टेशन्सच्या स्थापनेसाठी 86 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

"आम्हाला यावर्षी आतापर्यंत 5,000 कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत. भविष्यात याचा कंपनीच्या वाढीला निश्चितपणे हातभार लागेल.", असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनिष मोहनोत यांनी सांगितले.

मुंबई शेअर बाजारात कल्पतरु पॉवरचा शेअर आज(सोमवार) 290.95 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 287 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 298 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 27 मिनिटे) कंपनीचा शेअर 289.05 रुपयांवर व्यवहार करत असून 0.42 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: kalpataru power share up now