जिओमध्ये परदेशी कंपनीची 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

भारतीय डिजिटल इको प्रणालीत बदल करण्याच्या आमच्या प्रवासात केकेआर आमचा साथीदार असेल. हे सर्व भारतीयांसाठी फायदेशीर ठरेल. भारतात प्रिमियर डिजिटल सोसायटी बनवण्याचे आमचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य केकेआर मदतीने पूर्ण करू. असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

मुंबई : जिओमध्ये परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचा धडाका लावला आहे. 'केकेआर'ने रिलायन्स जिओमध्ये 11 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनी जिओमधील 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. महिन्याभरात जिओमध्ये झालेली ही पाचवी मोठी गुंतवणूक आहे.

अमेरिकेचा मोठा निर्णय : चीनी कंपन्या अमेरिकन शेअर बाजाराबाहेर

गेल्या आठवड्यात जनरल अटलांटिक या कंपनीने 6 हजार 598 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. आशिया खंडातील केकेआरची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.भारतीय डिजिटल इको प्रणालीत बदल करण्याच्या आमच्या प्रवासात केकेआर आमचा साथीदार असेल. हे सर्व भारतीयांसाठी फायदेशीर ठरेल. भारतात प्रिमियर डिजिटल सोसायटी बनवण्याचे आमचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य केकेआर मदतीने पूर्ण करू. असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

6 महीने EMI मध्ये मिळालेली सूट फायद्याची आहे का? 

जिओमध्ये झालेल्या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये परदेशी कंपन्यांनी एकूण 78 हजार 562 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत जिओने पाच कंपन्यांना गुंतवणुकीतून 16.12 टक्के हिस्सा विकला आहे. जिओ प्लॅटफॉर्म ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीची सहाय्यक कंपनी आहे. भारतातील आघाडीची "नेक्स्ट जनरेशन" तंत्रज्ञान कंपनी बनली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KKR to invest Rs 11367 crore into Jio Platforms Reliance