esakal | 6 महीने EMI मध्ये मिळालेली सूट फायद्याची आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

EMI, Bank, Loan

1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करण्यास सूट देण्यात आली आहे. पुढील तीन महिने कर्जाचा हप्ता देण्यासाठी बँकांकडून कोणताही दबाव टाकण्यात येणार नाही, असे आरबीआयच्या गव्हर्नरांनी स्पष्ट केले आहे.

6 महीने EMI मध्ये मिळालेली सूट फायद्याची आहे का?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कर्जदारांना मोठा दिलासा दिलाय. लोन मोरोटॉरियममध्ये यापूर्वी दिलेली सूट आणखी तीन महिने कायम राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी ही सुविधा 31 मेपर्यंत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. शक्तिकांत दास म्हणाले की, लॉकडाउनचा कालावधी वाढवल्यानंतर मोरोटॉरियमचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करण्यास सूट देण्यात आली आहे. पुढील तीन महिने कर्जाचा हप्ता देण्यासाठी बँकांकडून कोणताही दबाव टाकण्यात येणार नाही, असे आरबीआयच्या गव्हर्नरांनी स्पष्ट केले आहे.  

गांधी कुटुंबियांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या महिला आमदाराचे प्रियांका गांधींवर टिकास्त्र

मोरोटॉरियमच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जी सुविधा दिली आहे याचा अर्थ तुम्ही पुढील काळात कर्जाचा हप्ता भरला नाही तरी तुमचे नाव डिफॉल्टरच्या यादीत समाविष्ट केले जाणार नाही. यासाठी तुमच्या बँकेची सहमती गरजेची असेल. याचा अर्थ आपल्या ग्राहकांना ही सुविधा द्यायची की नाही याचे अधिकार संबंधित बँकांना असतील. मार्चच्या तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 25-71 टक्के कर्जदारांनी मोरोटॉरियमचा लाभ घेतला आहे. कृषी कर्ज, मायक्रो-क्रेडिट, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड्स गटातील कर्जदारांनी मोठ्या प्रमाणात ही सुविधा वापरली आहे. या सुविधेचा महत्त्वाचा फायदा केवळ एवढाच आहे की हप्ता न भरल्यामुळे वसूल होणारा दंड आकारला जाणार नाही. 

जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मिळाली मोठी जबाबदारी

सध्याच्या घडीला ही सुविधा दिलासा देणारी वाटत असली तरी अवधी संपल्यानंतर 6 महिन्याच्या थकीत हप्तामुळे कर्जाची मुदत आणखी वाढेल. समजा तुमचे कर्ज पाच वर्षांच्या मुदतीचे असेल तर त्यात मोरोटॉरियमचा कालावधी समाविष्ट होईल. सूट मिळालेल्या अवधीतील व्याज तुम्हाला पुढील हप्त्यामध्ये वाढीव भरावे लागेल. त्यामुळे सध्या असणारा हप्त्याची रक्कमेत वाढ होईल. (उदा. 5 वर्षांच्या कर्ज मुदतीसाठी सध्या तुमचा हप्ता हा 10 हजार रुपये असेल आणि तुम्ही मोरोटॉरियमची सुविधा घेतली असेल तर या सुविधेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्यांचे व्याज पुढील हप्त्यांमधून वसूल केले जाईल. परिणामी तुमच्या हप्त्याची रक्कम ही 10 हजारपेक्षा अधिक होवू शकते)  त्यामुळे या सुविधेचा लाभ घेताना आपल्या बँक सल्लागाराचा सल्ला घेणे योग्य ठरेल. जर सध्याच्या परिस्थितीत हप्ता भरणे शक्य असेल तर तो वेळीच भरलेला फायद्याचाच ठरेल.