भक्कम फंडामेंटल असणारा हा स्वस्त स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ? |Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates | Stock Market News

भक्कम फंडामेंटल असणारा हा स्वस्त स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ?

शेअर मार्केटमध्ये सध्या लिस्टेड कंपन्या मार्च तिमाहीचे निकाल सादर करत आहेत. तिमाही निकालांमुळे शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला आता शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एका शेअरची निवड केली आहे. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips) शेअर्सच्या खरेदीचा सल्ला आहे. त्यांच्या मते ही उत्तम दर्जाची कंपनी आहे. या कंपनीने एनसीआरमध्ये 24*7 रिटेल चेन सुरु केल्या आहेत. या स्टॉकचे व्हॅल्युएशन खूप स्वस्त आहे. ( Is this cheap stock with strong fundamentals in your portfolio?)

गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips)

सीएमपी (CMP) - 1224.40 रुपये

टारगेट (Target) - 1350 रुपये

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील एक लीटरचा भाव

कंपनीचे फंडामेंटल्स ?

कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम असल्याचे जैन यांनी सांगितले. ही कंपनी सुमारे 2 टक्के डिविडेंड यील्ड देते. प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग सुमारे 73 टक्के आहे. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 23-24 टक्के आहे.

हेही वाचा: मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत घट

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Web Title: Know About The Cheapest Stock Which Have Strong Fundamentals Value Should Be In Your Portfolio

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top