esakal | मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत घट
sakal

बोलून बातमी शोधा

mutual fund

मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीतील ओघ आटल्याची माहिती अॅम्फीच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 5,256.52 कोटी रुपयांची गुतंवणूक झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील गुंतवणुकीत 15 टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 6,212.96 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 
मागील वर्षी मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 5,847.07 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत घट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

एप्रिलच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीत मे महिन्यात वाढ

*  मे महिन्यात म्युच्युअल फंडात एकूण 70,813.4 कोटी रुपयांची गुंतवणूक
* मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 5,256.52 कोटी रुपयांची गुतंवणूक
* एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील गुंतवणुकीत 15 टक्क्यांची घट
* एप्रिल महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 6,212.96 कोटी रुपयांची गुंतवणूक
* लार्ज कॅप आणि मल्टी कॅप फंडांना गुंतवणूकदारांचे प्राधान्य

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीतील ओघ आटल्याची माहिती अॅम्फीच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 5,256.52 कोटी रुपयांची गुतंवणूक झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील गुंतवणुकीत 15 टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 6,212.96 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 
मागील वर्षी मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 5,847.07 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​

लक्षणीय बाब म्हणजे मे महिन्यात म्युच्युअल फंडात एकूण 70,813.4 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक मात्र वाढली आहे. एप्रिल महिन्यात एकूण 45,999.5 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. डेट फंड आणि काही हायब्रीड प्रकारातील फंडांमधील गुंतवणुकीत या कालावधीत वाढ झाली आहे. मे महिन्यात डेट म्युच्युअल फंड प्रकारात 63,665.54 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर एप्रिल महिन्यात डेट प्रकारात 43,431.55 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एसआयपीच्या माध्यमातून मे महिन्यात एकूण 8,123.03 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर एप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 8,376.11 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार लार्ज कॅप आणि मल्टी कॅप फंडांना प्राधान्य देत आहेत.