बँक अकाउंट इनॲक्टिव्ह झालंय? असे करा पुन्हा सुरु

bank Account
bank AccountGoogle

जगभरात कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) थैमानामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व बँकांमध्ये काही तातडीचे काम असेल तरच बँकेत येण्याचा सल्ला देत आहेत. बऱ्याच वेळा तर असे आर्थिक व्यवहार हे ऑनलाईनच केले जात आहेत. बऱ्याच जणांचे उद्योग बंद झाले आहेत, तर हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांचे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांचे बॅक खाते (Bank Account) इनॲक्टिव्ह (Inactive) झाले आहेत. जर आपल्या बँक खात्यावर एक वर्षापेक्षा जास्त काळापासून कुठलाही व्यवहार झाला नसेल तर आपल्याला आपले खाते पुन्हा सक्रिय (Activate) करावे लागाणार आहे. (know how to reactivate your inactive bank account)

बँक खाते कधी निष्क्रिय होते?

बँकेच्या नियमांनुसार, जर आपण 12 महिन्यांपर्यंत आपल्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले नाही तर आपले खाते निष्क्रिय होईल. तसेच, जर तुम्ही सलग 24 महिने बँकेत कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले नाहीत तर तुमचे खाते डॉरमेंट यादीत टाकले जाते. या दोन्ही प्रकारात तुम्हाला खाते पुन्हा सक्रिय करावे लागते.

bank Account
धूमधडाक्यात करू शकता लेकीचं लग्न!; LIC मध्ये करा फक्त 121 रुपयांची गुंतवणूक

खाते पुन्हा ॲक्टिव्ह कसे करावे?

आपले बँक खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक शाखेत जावे लागेल. येथे आपण याबद्दल अर्ज करुम आपल्या आवश्यक कागदपत्रांसह तो सबमिट करावा लागेल. यानंतर आपले खाते सक्रिय केले जाईल. जर कोणत्याही परिस्थितीत आपले खाते असलेल्या बँकेच्या शाखेत आपण जाऊ शकत नसाल, तर त्या बँकेच्या जवळपासच्या कुठल्याही शाखेत जाऊन देखील खाते सक्रिय करु शकता.

bank Account
तुमचा पगार आहे अनियमित पण बचत करायचीय? असे करा नियोजन

खात्यातून वर्षात एकदा व्यवहार होणे गरजेचे

प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा तरी त्याच्या बँक खात्यातून व्यवहार करणे आवश्यक आहे. असा व्यवहार केल्याने खाते सक्रिय स्थितीत राहील आणि आपण कोणत्याही प्रकारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन बँकिंग वापरू शकता. सलग 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ खात्यातून व्यवहार न करणार्‍या खात्यास निष्क्रिय / निष्क्रियतेच्या यादीमध्ये टाकले जाते.

(know how to reactivate your inactive bank account)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com