चार दिवसात नोंदणी करा... शेकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे

PM kisan
PM kisan

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला ३१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. म्हणजेच 10वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या चार दिवसांत संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील. पीएम किसान योजनेअंतर्गत होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. याअंतर्गत आता पीएम किसान योजनेत नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. त्याच वेळी, रेशन कार्डच्या गरजेसोबतच, आता नोंदणीच्या वेळी केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील.

4000 रुपयांचा फायदा होणार

तुम्ही अद्याप पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत तुमचे नाव नोंदवले नसेल, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. पीएम किसान अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने 31 ऑक्टोबरपूर्वी स्वतःची नोंदणी केली तर, त्याला 4000 रुपये मिळतील. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला, तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला 2000 रुपये मिळतील आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये 2000 रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याअंतर्गत 15 डिसेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणे अपेक्षित आहे. या हप्त्यात 2000 ऐवजी 4,000 रुपये ट्रान्सफर होतील असेही सांगण्यात येत आहे. मात्र, मोदी सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला PM किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com