esakal | नोकरी बदलल्यावर लगेच PF काढण्याच्या विचारात आहात? स्वतःचं नुकसान करायच्या आधी हे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

pf

नोकरी बदलल्यावर लगेच PF काढण्याच्या विचारात आहात? स्वतःचं नुकसान करायच्या आधी हे वाचा

sakal_logo
By
सुमित बागुल

प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी बदलणे अगदीच साधी गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळी नोकरी बदलल्यावर लगेच एम्प्लॉयी प्रोव्हीडेंट फंड (EPF) काढणे हा योग्य पर्याय नाही, का ते पाहूया. नोकरी बदलल्यावर EPF चे पैसे काढण्याऐवजी आपला EPF आणि एंप्लॉयीज पेन्शन स्कीम (EPS) चे पैसे नव्या EPF अकाउंटमध्ये ट्रांसफर करणे कधीही चांगला पर्याय आहे. (How to withdraw PF, EPS money after leaving your job)

हेही वाचा: SBI vs HDFC vc ICICI vs BOB: कोणती बँक सिनिअर सिटिझन्सना FD वर जास्त रिटर्न देते

किती द्यावा लागेल टॅक्स ?

जर तुम्ही कॉन्ट्रिब्यूशनचे 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच EPF चे सगळे पैसे काढत आहात तर तुम्हाला टॅक्स बेनेफिट मिळणार नाही. म्हणजे EPF मध्ये कॉन्ट्रिब्यूशन केल्यावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 C अंतर्गत जी सूट तुम्हाला मिळते ती बंद होईल. जर तुम्ही एक EPF अकाउंट दुसऱ्या EPF अकाउंटमध्ये ट्रांसफर करत आहात तर टॅक्स सूट मिळण्याचा फायदा रिव्हर्स नाही होणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळेच आम्ही सांगत आहोत की नोकरी बदलली की लगेच पीएफ काढू नका तो दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करणे जास्त योग्य ठरेल.

हेही वाचा: फ्लेक्सिकॅप फंडात गुंतवणूक का?

पेन्शन बेनेफिट

EPS मेंबर जर 10 वर्षांचे कॉन्ट्रिब्यूशन पूर्ण करत आहेत तर 58 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना पेन्शन लागू होते. जर कोणी व्यक्ती 58 वर्ष आधीच रिटायर होतात आणि EPS मध्ये 10 वर्षांचे कॉन्ट्रिब्यूशन असेल तर त्यांनाही पेन्शन मिळू शकते.

हेही वाचा: ‘इंटेलिजंट इन्व्हेस्टर’

कसे कॅल्क्युलेट करायचे EPFO पेन्शन ?

EPFO मेंबरच्या पेन्शनचे कॅलक्युलेशन खालील पद्धतीने करता येऊ शकेल.

मंथली पेन्शन = (सॅलरीमधील पेन्शनचा हिस्सा X नोकरीचे वर्ष ) / 70

ज्या लोकांनी 16 नोव्हेंबर 1995 च्या नंतर नोकरी जॉईन केली असेल तर त्यांच्यासाठी पेन्शनेबल सॅलरी EPS कॉन्ट्रिब्यूशन बंद करण्याआधी 60 महीन्यांची सरासरी असेल. सध्या तरी जास्तीत जस्ट पेन्शनेबल सॅलरी 15,000 रुपये महिना आहे.

loading image
go to top