SBI vs HDFC vc ICICI vs BOB: कोणती बँक सिनिअर सिटिझन्सना FD वर जास्त रिटर्न देते

bank
bankGoogle

एसबीआय (SBI), बँक ऑफ बडोदा (BOB), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि HDFC बँक (HDFC) सिनिअर सिटिझन्सना स्पेशल एफडी स्कीम ऑफर करत आहेत. सगळ्याच बँका सिनिअर सिटिझन्स डिपॉझिट स्कीमवर चांगला व्याजदर ऑफर करत आहेत. सध्या SBI, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आणि HDFC बँक सिनिअर सिटिझन्ससाठी स्पेशल एफडी स्कीम ऑफर करत आहेत. जाणून घेऊयात या बँका किती व्याज ऑफर करत आहेत.

SBI चे व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या स्पेशल एफडीचे नाव SBI We care आहे. SBI च्या या स्कीममध्ये सिनिअर सिटिझन्सना 5 वर्ष ते 10 वर्षांच्या FD वर 6.20% व्याज मिळत आहे. हे व्याज 2 कोटीपेक्षा कमी रुपयांच्या FD वर मिळत आहे.

bank
नागरिकांना दिलासा; बिगर हॉलमार्क दागिने विकता येणार!

HDFC बँकेचे व्याज दर

सिनिअर सिटिझन्सना HDFC बँक आपल्या ग्राहकांना HDFC Senior Citizen Care FD स्कीम ऑफर करत आहे. या स्कीम अंतर्गत 5 वर्ष टेन्युअरसाठी HDFC Senior Citizen Care फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये सिनिअर सिटिझन्सना सामान्य लोकांपेक्षा 0.75% जास्त व्याज मिळत आहे. सिनिअर सिटिझन्सनना FD वर 6.25 टक्के व्याज मिळत आहे.

BOB चे व्याज दर

स्पेशल सिनिअर सिटिझन्स एफडी स्कीमच्या अंतर्गत बँक ऑफ बडोदा (BOB) सिनिअर सिटिझन्सना 5 वर्ष ते 10 वर्षांसाठी FD वर 6.25% टक्क्याने व्याज दर ऑफर करत आहे.

bank
येत्या आठवड्यात 'या' शेअर्सवर ठेवा नजर, मिळू शकतो तगडा परतावा

ICICI बँकेचे व्याज दर

ICICI बँक Golden Years नावाने सिनिअर सिटिझन्सना स्कीम ऑफर करत आहे. इथे FD वर सिनिअर सिटिझन्सना 6.30 टक्के दराने व्याज देत आहेत.

एफडी (FD) हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत सुरक्षित असा पर्याय आहे. या स्कीममध्ये सगळ्याच बँका 2 कोटीपेक्षा कमी पैशांवर सिनिअर सिटिझन्सना चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. याचा अर्थ पैसे सुरक्षित आणि सोबत चांगले व्याज दर, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी एफडीच्या या स्पेशल स्कीममध्ये पैसे गुंतवले तर नक्की फायदा होईल. अधिक माहितीसाठी जवळच्या बँकेत संपर्क साधावा.

bank
झोमॅटोच्या IPOला मंजुरी; गुंतवणूकीआधी जाणून घ्या 'या' गोष्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com