मुलाला गिफ्ट देताय? जाणून घ्या आयकर विभागाच्या मर्यादा

तुम्ही गिफ्ट देत असाल, आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आयकर विभागाला याची माहिती नसेल, तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
gift
gift

वडील म्हणून मुलाला एखादी भेटवस्तू देत असताना कोणीही फारसा विचार करत नाही. मुलांना गिफ्ट देऊन सरप्राईज करणं, कोणत्याही पित्याला आवडेल. मात्र तुम्ही गिफ्ट देत असाल, आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आयकर विभागाला याची माहिती नसेल, तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या कर कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू देण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, विशिष्ट प्रकरणांमध्ये क्लबिंगच्या तरतुदी येतात. भेटवस्तू मिळालेल्या व्यक्तीला प्राप्त झालेल्या उत्पन्नासंदर्भात हे नियम लागू होतात. सून आणि एखाद्याच्या जोडीदाराला दिलेल्या भेटवस्तूंप्रमाणे मालमत्तेच्या हस्तांतरणामुळे जमा होणारे उत्पन्न गिफ्ट करणाऱ्या व्यक्तीच्या हातात जमा करणे आवश्यक आहे.

भेटवस्तू देण्याच्या प्रक्रियेत कर भरण्याच्या घटनांचा संबंध आहे. भारतीय कर कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला मिळालेली भेट, साधारणपणे, एखाद्या व्यक्तीला वर्षभरात मिळालेल्या सर्व भेटवस्तूंची एकूण रक्कम पन्नास हजारांपेक्षा जास्त झाल्यास ते करपात्र बनते. जोपर्यंत वर्षभरात मिळालेल्या सर्व भेटवस्तूंची बेरीज पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त होत नाही, तोपर्यंत कर भरण्यात पूर्णपणे सूट आहे.

परंतु पन्नास हजारांचा उंबरठा ओलांडल्यावर संपूर्ण रक्कम करपात्र होते. मात्र, यालाही काही अपवाद आहेत. त्यामुळे ही नियमावली सरसकट लागू होत नाही. अशा अपवादांपैकी एक म्हणजे विशिष्ट नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या बाबतीत आहे. वडील आणि मुलाचे नाते यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून वडील दोघांना कोणत्याही कर न लावता आपल्या मुलाला कोणतीही भेट देऊ शकतात.

...नाहीतर दंड!

भेटवस्तू देण्यासंबंधीच्या कर कायद्यानुसार एखादी व्यक्ती दोन लाख रुपये रोखीने स्वीकारत असल्यास दंडास पात्र होऊ शकतो. म्हणजेच दोन लाख किंमतीच्या बरोबरीची कोणतीही भेटवस्तू आल्यास त्यासंबंधी विवरण पत्रात माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन लाखांच्या पुढे भेटवस्तू रोख स्वरुपात स्वीकारणे टाळा, असे तज्ञांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com