
भारतातील आजवरचे सर्वात मोठे IPO, जाणून घ्या टॉप 10 नावं
आयपीओसाठी 2021 वर्ष आकर्षक आहे. एकूण 65 आयपीओने ₹131,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम संकलित केली आहे. या वर्षादरम्यान सर्वात मोठा IPO पेटीएमचा होता ज्याने ₹18,300 कोटी कलेक्ट केले होते. आता 4 मे ला एलआयसीचाही IPO येत आहे. LIC IPO ही देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असणार आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा: गर्भवती महिलांना केंद्र सरकार देणार पैसे
भारतातील टॉप 10 IPO खालील प्रमाणे-
1. PAYTM
Paytm ची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 18,300 कोटी रुपयांपर्यंतचा IPO अजूनही देशातील स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठा आकडा आहे. याआधी कोल इंडिया आयपीओ सर्वात मोठा आयपीओ होता
2. कोल इंडिया
दुसरा क्रमांक कोल इंडियाचा आहे. सरकारी मालकीच्या कोल इंडियाने ऑक्टोबर 2010 मध्ये IPO द्वारे 15,475 कोटी रुपये उभे केले होते.
3. रिलायन्स पॉवर
रिलायन्स पॉवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनिल धीरुभाई अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स पॉवरने जानेवारी 2008 मध्ये IPO द्वारे 11560 कोटी रुपये उभे केले.
4. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
2017 मध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने IPO द्वारे11,175.84 कोटी रुपये उभे केले.
हेही वाचा: RBI चा डिजिटल रुपया 2023 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता : अर्थमंत्री
5. SBI कार्ड आणि पेमेंट सेवा
2020 मध्ये, SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस, ज्याची मालकी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे, ने 10,354.77 कोटी रुपये उभारले.
6. न्यू इंडिया इश्युरन्सन
सरकारी विमा कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्सचा आयपीओ नोव्हेंबर 2017 मध्ये आला होता. कंपनीने IPO च्या माध्यमातून 9600 कोटी जमा केले आहेत.
7. झोमॅटो
झोमॅटो 2021 मध्ये आला असता, या ऑनलाइन फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनी Zomato ने 9,375.00 कोटी रुपये उभे केले.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजार दमदार! सेन्सेक्स 701 अंकानी वधारला तर निफ्टी 17,245 वर बंद
8. DLF
DLF या सर्वात मोठ्या भारतीय रिअल इस्टेट कंपनीचा IPO जून 2007 मध्ये आला होता. त्यावेळी कंपनीने IPO च्या माध्यमातून 9187 कोटी रुपये उभे केले होते.
9. HDFC
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स 2017 मध्ये आला होता त्याने IPO मध्ये 8,695.01 कोटी रुपये उभे केले होते. SBI लाइफ इन्शुरन्स चा प्रतिस्पर्धी मानला जातो
10. SBI लाइफ इन्शुरन्स
SBI लाइफ इन्शुरन्स 2017 मध्ये आला होता. SBI लाइफ इन्शुरन्सने 8,400.00 कोटी रुपये उभे केले होते.
Web Title: Know Top 10 Ipo In India Check List
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..