फेसबुक आणतंय डिजिटल करन्सी... !

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

कॅलिफोर्निया: सोशल मीडिया प्लँटफॉर्म असलेले फेसबुक आता डिजिटल करन्सी आणणार आहे. फेसबुक येत्या वर्षात बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे 'फेसबुक लिब्रा' (Libra) ही क्रिप्टो करन्सी सादर करणार आहे. हे एक सुरक्षित चलन असणार असून फेसबुकमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही क्रिप्टोकरन्सी वापरता येईल असा दावा फेसबुकने केला आहे. 

कॅलिफोर्निया: सोशल मीडिया प्लँटफॉर्म असलेले फेसबुक आता डिजिटल करन्सी आणणार आहे. फेसबुक येत्या वर्षात बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे 'फेसबुक लिब्रा' (Libra) ही क्रिप्टो करन्सी सादर करणार आहे. हे एक सुरक्षित चलन असणार असून फेसबुकमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही क्रिप्टोकरन्सी वापरता येईल असा दावा फेसबुकने केला आहे. 

लिब्रा या क्रिप्टोकरन्सीचा जगभर प्रसार, प्रचार आणि वापर वाढावा यासाठी फेसबुक आता जगभरातील अनेक लोकप्रिय ब्रँडसोबत करार करणार आहे  क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सहजपणे व्यवहार करण्यासाठी फेसबुक अतिसुरक्षित पेमेंट प्लॅटफॉर्मवर करत असून २०२० मध्ये लिब्रा क्रिप्टोकरन्सी येण्याची शक्यता आहे. यावर सध्या चाचणी सुरु असून भविष्यात लिब्राकरन्सीमार्फत फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंट करता येईल.

गेल्यावर्षी बिटकॉइन या 'क्रिप्टोकरन्सी'ने 19,783 अमेरिकी डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून 'क्रिप्टोकरन्सी' सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता डिजीटल पैशांचे व्यवहारही करता येणे शक्य होणार आहे.  हे डिजीटल कॉइन्स मॅसेजप्रमाणेच समोरच्याला सेन्ड करता येतील. प्रत्येक कॉइनचे डॉलरमध्ये व संबंधित देशांच्या चलनामध्ये मुल्य असेल. यानुसार ठराविक कॉइन्स पाठवून पैशांचे व्यवहार आता करता येणार आहेत. क्रिप्टोकरन्सी कोणतीही बँक नियंत्रित करत नाही. 

भारतामध्ये मात्र क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना कायदेशीर मान्यता नाही. शिवाय जगभरातील बऱ्याच देशांनी देखील क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे फेसबुकच्या क्रिप्टोकरन्सीला भारतासह इतर देशात कायदेशीर मान्यता मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय यूएस कॉंग्रेस देखील फेसबुकच्या 'फेसबुक लिब्रा' (Libra) या क्रिप्टोकरन्सीच्या प्रकल्पाची तपासणी करणार आहे. त्यामुळे कंपनीला  'फेसबुक लिब्रा' लाँच करण्याची  प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Libra: Facebook launches cryptocurrency in bid to shake up global finance