LICची नवी 'विमा रत्न पॉलिसी' लाँच, अधिक जाणून घेऊयात...

एलआयसीने 'विमा रत्न' ही नवीन पॉलिसी लाँच केली आहे.
LIC Bima ratn policy
LIC Bima ratn policySakal

एलआयसीने 'विमा रत्न' ही नवीन पॉलिसी लाँच केली आहे. ही पॉलिसी संरक्षण आणि बचत (Security and savings) दोन्ही उद्देशांसाठी बेस्ट पर्याय आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड आणि बचत जीवन विमा योजना आहे जी देशांतर्गत बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार केली आहे. हे प्रॉडक्ट इन्शुरन्स मार्केटिंग फर्म (IMF), कॉर्पोरेट एजंट आणि ब्रोकर्स यांच्यामार्फत खरेदी केले जाऊ शकते.

कर्जाची सुविधा
'विमा रत्न' पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचे अकाली निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने LIC ने ही नवीन ऑफर सुरू केली आहे. पॉलिसीधारक जिवंत असल्यास, त्याच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला ठराविक अंतराने पेमेंट केले जाईल. शिवाय यात कर्जाची सुविधाही देण्यात आली आहे.

LIC Bima ratn policy
LIC समभाग शेअर बाजारात सूचिबद्ध; पॉलिसीधारकांवर काय होणार परिणाम?

डेथ बेनेफिट (Death Benefit)
LIC च्या अधिकृत वेबसाइटनुसार,पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास मृत्यूवरील विम्याची रक्कम मूळ विमा रकमेच्या 125% किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट जास्त असेल. डेथ बेनेफिट हा एकूण भरलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसेल. पण 8 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत, जोखीम सुरू होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास, कोणताही अतिरिक्त प्रीमियम किंवा रायडर प्रीमियम वगळता भरलेल्या प्रीमियमचा परतावा मिळेल.


सर्वायव्हल बेनिफिट (Survival Benefit)-
पॉलिसीची मुदत 15 वर्षे असेल तर LIC 13व्या आणि 14व्या पॉलिसी वर्षांच्या शेवटी मूळ विमा रकमेच्या 25% रक्कम देईल. 20 वर्षांची मुदत असल्यास, LIC ला प्रत्येक 18 व्या आणि 19 व्या पॉलिसी वर्षांच्या शेवटी मूळ विमा रकमेच्या 25% रक्कम द्यावी लागेल. दरम्यान, पॉलिसी योजना 25 वर्षांच्या मुदतीसाठी असल्यास, LIC ला प्रत्येक 23व्या आणि 24व्या पॉलिसी वर्षांच्या शेवटी 25% रक्कम द्यावी लागेल.

LIC Bima ratn policy
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : मोफत गॅस जोडणी मिळत नसेल तर काय कराल ?

मॅच्युरिटी बेनिफिट (Maturity Benefit)-
एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मॅच्युरिटीवर हमी जोडणीसह (Sum Assured) विम्याची रक्कम मिळेल. महत्त्वाचे म्हणजे, "मॅच्युरिटीवरील विमा रक्कम" "मूलभूत विमा रकमेच्या" (Basic Sum Assured) 50 टक्के असेल.

इतर फायदे-
LIC 1 ते 5 व्या वर्षापर्यंत 1000 रुपयांच्या मूळ पेमेंटसाठी 50 रुपये अतिरिक्त गॅरेंटी देईल. दरम्यान, 6व्या ते 10व्या पॉलिसी वर्षापर्यंत, प्रत्येक मूळ विमा रकमेसाठी 1000, पेआउट 55 रुपये असेल आणि 11 व्या ते 25 व्या पॉलिसी वर्षापर्यंत 1000 रुपयांच्या मूळ विमा रकमेसाठी हमी दिलेली रक्कम 60 रुपयांपर्यंत वाढेल. पॉलिसीधारक नियमित वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक अंतराने प्रीमियम भरू शकतो. पॉलिसीचा प्रीमियम भरण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. या पॉलिसीमध्ये किमान विम्याची रक्कम 5 लाख रुपये आहे. कमाल विम्याच्या रकमेवर मर्यादा नाही.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com