प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : मोफत गॅस जोडणी मिळत नसेल तर काय कराल ? | Pradhan Mantri Ujjwala Yojana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Ujjwala Yojana

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : मोफत गॅस जोडणी मिळत नसेल तर काय कराल ?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील माता-भगिनींसाठी पीएम उज्ज्वला योजना सुरू केली आहे. याअंतर्गत महिलांना Free Gas Connection देण्यात आले आहे. यासोबतच त्यांना इतरही लाभ देण्यात आले. यामुळे कोट्यवधी घरांमध्ये गॅस जोडणी होऊ शकली. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

हेही वाचा: प्रधानमंत्री कुसुम योजना; सौरऊर्जेच्या विजेतून पैसे कमवा

या योजनेंतर्गत गॅस जोडणी मिळवण्यात ज्यांना अडचण येत आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकार आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक मदतवाहिनी क्रमांक जाहीर केला आहे.

हेही वाचा: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मातांसाठी ठरतीये संजीवनी; जाणून घ्या फायदे

आजही गाव-खेड्यांमध्ये जेवण करण्यासाठी चुलीचा वापर केला जातो. यात लाकूड, गोबर वापरावे लागते. ते सर्व गोळा करण्यासाठी महिलांना बरेच कष्ट घ्यावे लागतात. म्हणूनच सरकारने या योजनेची सुरूवात केली.

हेही वाचा: फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना स्वराज्य हॉस्पीटलमध्ये कार्यान्वित

देशातील लाखो महिलांना चुलीवर जेवण करावे लागते. यावेळी होणाऱ्या धुराने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहातो, याकडे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले होते. तसेच चुलीवर जेवण केल्याने प्रदूषणही होते.

हेही वाचा: प्रधानमंत्री पीक विमा योजना; १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव करावा लागेल सादर

तुम्हाला मोफत गॅस जोडणी मिळत नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार दाखल करू शकता. जाणून घ्या कसे...

प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या मोफत मदतवाहिनीवर संपर्क साधा...

१९०६ या क्रमांकावर मोफत संपर्क साधून तक्रार करता येईल.

तसेच 18002666696 क्रमांक संपर्क साधून गॅस जोडणीविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल.

Web Title: Not Getting Free Gas Connection Under Pm Ujjwala Yojana Call On Toll Free Number

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Prime Minister
go to top