LIC चा मेगा IPO या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमीच; सूत्रांची माहिती

सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल न करता LIC चा IPO लॉन्चसाठी केंद्राकडे 12 मे पर्यंत वेळ आहे.
LIC IPO
LIC IPOsakal media

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा (LIC) IPO या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बाजारात येणार नाही, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात (Share Market ) सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकार हा मेगा IPO पुढे ढकलू शकते असे सूत्रांनी सांगितले. तथापि, सेबीकडे (SEBI) नवीन कागदपत्रे दाखल न करता LIC चा IPO लॉन्च करण्यासाठी केंद्राकडे 12 मे पर्यंत वेळ आहे. मात्र, रशिया-युक्रेन (Russia Ukraine) युद्धाच्या पार्श्वमभूमीवर बाजारातील अस्थिरता कायम असल्याने एप्रिलच्या सुरुवातीस लिस्टिंग होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे या आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या गुंतवणुकदारांना आणखी का ही दिवस वाट पाहावी लागणार आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकशित केले आहे. (LIC IPO News In Marathi)

LIC IPO
हे मोदी, गडकरी आणि फडणवीसांना मान्य आहे का? : संजय राऊत

LIC ने दाखल केलेल्या मसुदा दस्तऐवजांना (DRHP) SEBI ने 13 फेब्रुवारी 2022 रोजी मान्यता दिली होती. त्यामुळे याच्या शेअर विक्रीचा मार्ग मोकळा झाला असून, यामध्ये सरकार सुमारे 316 कोटी शेअर्स म्हणजेच LIC मधील 5 टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना आखत आहे, ज्यातून सरकारी तिजोरीत सुमारे 60,000 कोटी रुपये येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

LIC IPO
पेपर फुटला नाही, फक्त काही भाग Whatapp वर, शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मसुद्याच्या दस्तऐवजानुसार, आंतरराष्ट्रीय मूल्यांकन कंपनी मिलिमन अॅडव्हायझर्सने एलआयसीच्या मूलभूत मूल्यावर काम केले असून, 30 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीचे मूळ मूल्य 5.4 लाख कोटी रुपये होते. विमा कंपनीतील भागधारकांच्या एकात्मिक मूल्याच्या आधारे अंतर्निहित मूल्य काढण्यात आले आहे. दरम्यान, LIC चे बाजार मूल्य DRHP मध्ये उघड करण्यात आलेले नाही, मात्र उद्योग मानकांनुसार ते मूल्य अंतर्निहित मूल्याच्या जवळपास तिप्पट असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली असून, LIC ने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एकूण IPO पैकी 35 टक्के राखीव ठेवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com