दररोज 160 रुपयांची गुंतवणूक मिळवून देईल 23 लाख रुपये

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 16 November 2020

LIC ग्राहकांना विविध प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते

नवी दिल्ली: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India- LIC) ही एक सरकारी विमा कंपनी आहे. जी ग्राहकांना विविध प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते. एलआयसीची बऱ्याच पॉलिसी लोकांना आवडतातही. अशातच ग्राहकांना जर थोडी गुंतवणूक करून भरपूर परतावा मिळवायचा असेल तर LIC मध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. एलआयसीने यासाठीच एक फायदेशीर योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी (LIC New Money Back Policy) आहे.

परतावा हमी-
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे हा विमा घेणाऱ्याला 5 वर्ष मनी बॅक, मॅच्युरिटीमध्ये चांगला परतवा, कर विम्यातही लाभ मिळतो. एलआयसीची ही मनी बॅक प्लॅन नॉन लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. ज्याला गॅरंटीड रिटर्न्स आणि बोनस मिळतो. ही योजना ग्राहकांना 20 वर्षे किंवा 25 वर्षे या 2 पर्याय उपलब्ध असेल.

Good News: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर; गोदरेजने ऑफर केलं सर्वांत स्वस्त लोन

ही पॉलिसी पूर्णपणे करमुक्त पॉलिसी आहे. त्याचबरोबर त्याचे व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्यूरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. या योजनेत जर तुम्ही 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपयांची गुंतवणूक केलीत तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपयांची राशी मिळणार आहे.

कोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP

दर पाचव्या वर्षी 20 टक्के पैसे परत-
एलआयसीच्या मते, ही योजना 13 वर्षे ते 50 वर्षांपर्यंतचा व्यक्ती घेऊ शकतो. या योजनेमध्ये दर पाचव्या वर्षी म्हणजेच पाचव्या वर्षी, दहाव्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी १५ ते २० टक्के पैसे परत मिळतील. पण त्याअगोदर प्रीमियमचे किमान 10 टक्के रक्कम जमा झाली पाहिजे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LIC New Money Back Policy get more profit