‘एलआयसी’चा प्रीमियम दीड लाख कोटींवर

‘एलआयसी’चा प्रीमियम दीड लाख कोटींवर

मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘न्यू बिझिनेस प्रीमियम’च्या माध्यमातून प्रथमच १.५० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. जानेवारीपर्यंत कंपनीच्या वैयक्तिक नवीन व्यवसायाच्या कामगिरीने पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्ये १७.४८ टक्के आणि पॉलिसींच्या संख्येत २९.४२ टक्के वाढ दर्शविली आहे. कंपनीचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम ४५ हजार १९९ कोटी रुपये असून, पॉलिसींची संख्या १ कोटी ९५ लाख ८५ हजार ६३५ आहे.

या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत कंपनीचा पॉलिसी आणि पहिल्या वर्षातील प्रीमियममधील संमिश्र बाजाराचा हिस्सा अनुक्रमे ७७.६१ टक्के आणि ७०.०२ टक्के आहे. गेल्या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत पॉलिसींच्या संख्येत ७३.५४ टक्के आणि पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्ये ६६.२६ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. कंपनीने पेन्शन आणि ग्रुप स्कीम्स व्हर्टिकल, ग्रुप स्कीम्स आणि सुपरॲन्युएशन व्यवसायाची काळजी घेत चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांहून अधिक प्रीमियम उत्पन्न मिळवून एक नवीन विक्रम निर्माण केला. 

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ सादर करण्याची घोषणा केल्यापासून कंपनीविषयीचे आकर्षण वाढीला लागले आहे. याच दरम्यान कंपनीने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. नव्या विमा प्रीमियममुळे कंपनीच्या एकूण कमाईचा एकूण आकडा प्रथमच १.५ लाख कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे ‘एलआयसी’चा बाजारहिस्सा वाढून ७७.६१टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com